IMPIMP

Maharashtra Political News | ‘काहीही झालं तरी महाराष्ट्रात भूकंप होणारच’, अंबादास दानवेंचं मोठं वक्तव्य

by nagesh
Maharashtra Political News | shivsena ubt leader ambadas danve on supreme court hearing on maharashtra political dispute and gautam adani and sharad pawar meeting

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Political News | राज्याच्या सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) सुनावणीत नेमकं
काय होणार? 16 आमदारांच्या अपात्रतेचा मूळ मुद्दा सुप्रीम कोर्ट (Supreme Court) नेमका कसा सोडवणार?, निकाल कोणाच्या बाजूने लागणार?
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Political News) याचीच चर्चा सुरु आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan
Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुका (Assembly Elections) पार
पडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागेल, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधानावर विधान परिषदेचे (Legislative Council) विरोधी पक्षनेते (Opposition Leader) अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रतिक्रिया देताना मोठं विधान केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही लागला तरी महाराष्ट्रात राजकीय (Maharashtra Political News) भूकंप तर होणारच आहे, असं विधान अंबादास दानवे यांनी केलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

 

अंबादास दानवे पुढे म्हणाले, कर्नाटक निवडणुकीचा (Karnataka Election) आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा काहीही संबंध असले, असं मला वाटत नाही. सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. यावर आता लवकरात लवकर निकाल लागावा, अशी संपूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे. निकाल काहीही लागला तरी भूकंप तर होणारच आहे. कोणत्याही बाबी घडल्या तरी भूकंप होणार आहे. शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र (MLA Disqualified) ठरणार आणि सध्याचे सरकार गडगडणार… अशा प्रकारचे महाराष्ट्राचं जनमत आहे. कायद्यातही तेच नमूद केलं आहे, तेच व्हावं अशी आमची अपेक्षा असल्याचे अंबादास दानवे म्हणाले.

 

यावेळी अंबादास दानवे यांनी गौतम अदानी (Gautam Adani) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीवर भाष्य केलं.
ते म्हणाले, दोन व्यक्तींची भेट झाली म्हणून एखाद्या विषयाला खीळ बसू शकत नाही. सर्व विरोधी पक्षांनी जेपीसी चौकशीची (JPC Inquiry) मागणी केली आहे. सगळ्यांना मान्य असेल तर जेपीसीद्वारे चौकशी करायला काहीच हरकत नाह, अशी भूमिका शरद पवार यांनी यापूर्वी मांडली आहे. त्यामुळे गौतम अदानी यांनी भेट घेतली म्हणून शरद पवार यांनी आपली भूमिका बदलली असे म्हणण्याचे काहीच कारण नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Political News | shivsena ubt leader ambadas danve on supreme court hearing on maharashtra political dispute and gautam adani and sharad pawar meeting

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी डॉक्टरला जामीन मंजूर

Sub-Registrar Offices In Pune | नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण हिरालाल सोनवणे : अक्षय तृतीयेच्या दिवशी सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरु ठेवण्याचे आदेश

MLA Amol Mitkari | ‘ही सैतानी साम्राज्याची सुरुवात, ज्या दिवशी…’, ‘त्या’ प्रकरणावरून अमोल मिटकरींचा सरकारला इशारा

Roll Ball World Cup Tournament In Pune | उद्यापासून (दि. 21) रंगणार रोलबॉल विश्व करंडक स्पर्धेचा थरार ! 27 देश विजेतेपदासाठी भिडणार ; चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन

 

Related Posts