IMPIMP

Pune Crime News | बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी डॉक्टरला जामीन मंजूर

by nagesh
Pune Crime News Acquittal of female accused in kidnapping, rape by District and Sessions Court

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | लग्नाच्या आमिषाने (Lure of Marriage) तरुणीवर अत्याचार करणाऱ्या व नंतर तीचा
गर्भपात (Abortion) करणाऱ्या डॉक्टर विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidhyapeeth Police Station) गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. संबंधित डॉक्टरने तरुणीकडून साठ हजार रुपये उसने घेत तिची फसवणूक (Cheating Case) केली. हा प्रकार (Pune Crime News)
सप्टेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान घडला. 26 वर्षीय तरुणीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी डॉ. अंकुश गुंड याला अटक (Arrest) केली
होती. या गुन्ह्यात (Pune Crime News) अटक करण्यात आलेल्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश (Additional Sessions Judge) एस.बी.
राठोड (S.B. Rathod) यांनी जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे. अशी माहिती आरोपीचे वकील कृष्णा अवधूत काजळे (Adv. Krishna
Avadhoot Kajle) यांनी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी डॉ. अंकुश एकनाथ गुंड Dr. Ankush Eknath Gund (रा. आंबेगाव, पुणे) याच्यावर आयपीसी 376, 376 (2) (n), 312, 417, 420, 323, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली. आरोपीने अॅड. कृष्णा काजळे यांच्या मार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. अॅड. काजळे यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले, तक्रारदार तरुणीच्या संमतीने दोघांमध्ये शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित झाले होते. तरुणीने महाबळेश्वर येथे स्वत: हॉटेल बुक केले होते. तसेच या हॉटेलचे पैसे तिने स्वत: गुगल पे वरून दिले होते. याशिवाय हॉटेलच्या बिलांवर तिच्याच सह्या आहेत. तक्रारदार तरुणी ही स्वत: दुचाकीवरुन महाबळेश्वर येथे आली होती. (Pune Crime News)

 

तरुणीने ज्या हॉस्पिटलमध्ये गर्भपात केल्याचा उल्लेख केला आहे. त्या हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी चौकशी केली असता अशा प्रकारचा गर्भपात केला नसल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. तसेच तरुणीने ज्या डॉक्टरांचे नाव घेतले ते डॉक्टर आणि आरोपी हे मित्र असल्याने तिने त्या डॉक्टरांचे नाव घेतले. डॉ. अंकुश हे तरुणीसोबत लग्न करण्यास तयार होते. याबाबत चर्चा करण्यासाठी आरोपी आणि तरुणीच्या घरच्यांची शिवाजीनगर येथील एका हॉटेलमध्ये बैठक झाली.

 

या बैठकीत तरुणीच्या भावाने आणि त्याच्या मित्राने आरोपीला मारहाण केली. त्याच रात्री आरोपीने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
तरुणीने डॉ. अंकुश याच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. हा प्रकार तरुणीच्या संमतीने झाला असून आरोपी डॉ. अंकुश गुंड याचा जामीन मंजूर करण्याची विनंती अॅड. कृष्णा काजळे यांनी न्यायालयाला केली. वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीचा 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. या प्रकरणात अॅड. कृष्णा काजळे यांना अॅड. ऋषिकेश बडे (Adv. Rishikesh Bade) यांनी सहकार्य केलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय आहे प्रकरण? 
फिर्य़ादी तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, तरुणी आणि डॉ. अंकुश यांच्यात प्रेमसंबध निर्माण झाले. त्यानंतर आरोपीने तरुणी सोबत शारीरिक संबंध ठेवले. यानंतर तरुणी गर्भवती राहिल्यावर तिला औषधी गोळ्या खायला देऊन गर्भपात केला. आर्थिक अडचण असल्याचे सांगून तिच्याकडून 50- 60 हजार रुपये घेतले. तसेच तिच्या नावावर आयफोन घेतला. त्यानंतर तरुणी पुन्हा गर्भवती असताना आरोपीने तिला मारहाण केली. तसेच पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

 

Web Title :- Pune Crime News | Bail granted to accused doctor in rape case

 

हे देखील वाचा :

Sub-Registrar Offices In Pune | नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण हिरालाल सोनवणे : अक्षय तृतीयेच्या दिवशी सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरु ठेवण्याचे आदेश

MLA Amol Mitkari | ‘ही सैतानी साम्राज्याची सुरुवात, ज्या दिवशी…’, ‘त्या’ प्रकरणावरून अमोल मिटकरींचा सरकारला इशारा

Roll Ball World Cup Tournament In Pune | उद्यापासून (दि. 21) रंगणार रोलबॉल विश्व करंडक स्पर्धेचा थरार ! 27 देश विजेतेपदासाठी भिडणार ; चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन

CM Eknath Shinde | अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शहरांबद्दल आस्था ठेऊन; शहर विकासावर आपल्या कारकीर्दीची छाप सोडावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

 

Related Posts