IMPIMP

Maharashtra Political News | अजितदादा भाजपसोबत जाणार? राष्ट्रवादीचे आमदार म्हणाले – ‘परिस्थितीनुसार निर्णय…’

by nagesh
Maharashtra Political News | Will Ajitdada go with BJP? NCP MLA said - 'Decision according to the situation...'

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Political News | विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी 8 एप्रिलला
गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांची भेट घेतल्याचं वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलं आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात
एकच खळबळ उडाली आहे. (Maharashtra Political News) अशातच सोमवारी (दि.17) अजित पवारांनी आपले पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले.
त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नाराजीच्या चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे (NCP MLA Manikrao Kokate) यांनी अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी काही खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत. दोन दिवसांपूर्वी अवकाळी आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने (State Government) नुकसान भरपाई द्यावी, यासाठी अजित पवार यांना भेटलो, त्यांच्यासोबत 20 मिनिटं चर्चा झाली. त्यानंतर मी त्यांना विचारलं काय चाललंय सगळं? नॉट रिचेबल असण्याबाबत (Maharashtra Political News) त्यांना विचारलं, त्यांनी या अफवा असल्याचे सांगितलं, असं कोकाटे म्हणाले.

 

मात्र भाजपला फायदा होईल

 

माणिकराव कोकाटे पुढे म्हणाले, आम्ही पक्षाचे आमदार आहोत. पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील, आम्ही त्यासोबत राहू. राज्यातील राजकारण अत्यंत अस्थिर, विरोधी पक्षातील नतेही अस्थिर, भाजपला (BJP) अपेक्षित यश मिळत नाही, राष्ट्रवादी हा भाजपसाठी पर्याय आहे. राष्ट्रवादीला सोबत घेणं एवढा एकच पर्य़ाय भाजपकडे आहे. भाजपसोबत गेल्यास राष्ट्रवादीला फायदा होईल का माहिती नाही, मात्र भाजपला फायदा होईल, असं कोकाटे म्हआले.

 

तोपर्यंत राष्ट्रवादी काहीही निर्णय घेणार नाही

 

राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्यास केंद्रात पुन्हा भाजपची सत्ता येईल. अजित पवार भाजपसोबत गेले तर आम्ही त्यांच्यासोबत जाणार. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) निकाल येत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी काहीही निर्णय घेईल, असं वाटत नाही. निकालानंतरच परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाऊ शकतो. विकासकामांसाठी सत्तेशिवाय पर्याय नाही. भाजपसोबत जाण्याबाबत त्यांच्या बोलण्या वागण्यातून काहीही तसं जाणवलं नाही, अशी प्रतिक्रिया कोकाटे यांनी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

परिस्थितीनुसार निर्णय घ्यायचे असतात

 

तसेच आता आमचे आमदार अस्वस्थ आहेत हे नक्की. अजितदादा भाजपसोबत जाणार असलीत तर आम्ही पक्षासोबत दादांसोबत जाणार. राजकारणात परिस्थितीनुसार निर्णय घायचे असतात, असं सूचक वक्तव्य आमदार माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे.

 

 

Web Title : Maharashtra Political News | Will Ajitdada go with BJP? NCP MLA said – ‘Decision according to the situation…’

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political News | ‘अजितदादाच करेक्ट कार्यक्रम करतील’, शिवसेना मंत्र्यांचे महत्त्वाचं विधान

Appasaheb Dharmadhikari | उष्माघाताने श्री सेवकांचा झालेला मृत्यू माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक, याचे राजकारण होऊ नये – आप्पासाहेब धर्माधिकारी

Bombay High Court | मुंबई हायकोर्टाचा ठाकरे गटाला दणका तर शिंदे सरकारला दिलासा; BMC मध्ये 227 वॉर्ड राहणार

 

Related Posts