IMPIMP

Maharashtra Politics | ‘आमच्याकडे बहुमत असल्याने लवकर निर्णय घ्या..,’ शिंदे गटाचा निवडणुक आयोगासमोर दावा

by nagesh
Maharashtra Political News | all remaining 13 mlas of thackeray faction in touch with cm eknath shinde says uday samant

दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Politics | शिवसेनेच्या निवडणुक चिन्ह व पक्षाबद्दलच्या वादावरील सुनावणी आज निवडणुक आयोगासमोर पार पडली. यावर निवडणुक आयोगाने सुनावणी पुढे ढकलली असून आता येत्या शुक्रवारी अर्थात २० जानेवारीला याबाबतची पुढील सुनावणी निवडणुक आयोगासमोर होणार आहे. दरम्यान, यावेळी युक्तीवाद सुरू असताना शिंदे गटाचे वकिल महेश जेठमलानी यांनी आमच्याकडे बहुमत असुन याबाबतची सुनावणी लवकर घ्यावी अशी मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. ( Maharashtra Politics)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकिल महेश जेठमलानी म्हणाले की, ‘आम्ही जी कागदपत्रं, नोंदणी हे सगळं सादर केलं आहे. आमच्याकडे बहुमत आहे. आमच्या कागदपत्रांमध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत. ते सगळं ग्राह्य धरलं जावं आणि लवकरात लवकर चिन्हाचा निर्णय घ्यावा. पक्षातून एक मोठा गट बाहेर पडल्यावर तो बेकायदेशीर कसा? असंही महेश जेठमलानी यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही आमदार आणि खासदारांचा मोठा गट आमच्याकडेच आहे.’ असं देखील महेश जेठमलानी यांनी यावेळी बोलताना निवडणुक आयोगापुढे सांगितल.

 

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाकडून सादर करण्यात आलेली सर्व कागदपत्रे ही खोटी आहेत.
आणि जो पर्यंत सुप्रीम कोर्टात याविषयी निकाल लागत नाही, तोपर्यंत कुठलाही निर्णय घेऊ नये. असं म्हटलं होतं.
पण आज कपिल सिब्बल यांचे सर्व दावे फेटाळून लावत. या प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी व्हावी.
अशी मागणी शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केली. (Maharashtra Politics)

 

कपिल सिब्बल यांनी आजच्या सुनावणी दरम्यान काही महत्वाचे मुद्दे निवडणुक आयोगासमोर आणले.
कपिल सिब्बल म्हणाले, ‘पक्षात असताना जे आमदार निवडून आले आहेत ते पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत.
संख्याबळाचा दावा केला जातो आहे त्याचा पाया पक्ष आहे.
तुम्ही पक्षात असताना पक्षाच्या घटनेला आक्षेप का घेतला नाही असाही प्रश्न कपिल सिब्बल यांनी विचारला आहे.
शिंदे गटाच्या कागदपत्रांची सत्यता पडताळण्यासाठी ओळख परेड करा अशीही मागणी कपिल सिब्बल यांनी
केली आहे. तसेच ठाकरे गट या ओळख परेडीसाठी तयार असल्याचेही यावेळी बोलताना कपिल सिब्बल यांनी
निवडणुक आयोगाच्या निदर्शनास आणले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Politics | as eknath shinde has majority take decision early claims shinde group in front of election commission

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | ‘औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरे गटाचा खासदार होणार, चंद्रकांत खैरेंनी जाती-जीतींमध्ये भांडणं लावली’, शिंदे गटाच्या नेत्याचे गंभीर आरोप

Pune Crime News | मार्केटयार्डमध्ये पिस्तुलाचा धाक दाखवून 28 लाख रुपये लुटणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त रितेश कुमार यांची 5 वी कारवाई

Nitin Deshmukh | किरीट सोमय्या यांच्यावर नितीन देशमुख यांची खालच्या भाषेत टीका; म्हणाले…

 

Related Posts