IMPIMP

Maharashtra Politics | ‘औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरे गटाचा खासदार होणार, चंद्रकांत खैरेंनी जाती-जीतींमध्ये भांडणं लावली’, शिंदे गटाच्या नेत्याचे गंभीर आरोप

by nagesh
Maharashtra Politics | 'Balasaheb Thackeray's MP will be in Aurangabad, Chandrakant Khair has started a caste-jeet conflict', the leader of the Shinde group has made a serious allegation.

औरंगाबाद :  सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics | राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government)
आल्यापासून शिंदे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये संघर्ष सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका, आरोप
(Maharashtra Politics) करण्याची एकही संधी सोडत नाहीत. शिंदे गटाचे नेते संदिपान भुमरे (Shinde Group Leader Sandipan Bhumre)
यांनी ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Former MP Chandrakant Khaire) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. चंद्रकांत खैरे
यांनी जाती-जातींमध्ये भांडण लावून दिली. भांडण लावण्याशिवाय त्यांनी काहीच केले नाही. याच जोरावर ते खासदार झाले. त्यांना कोणी किंमत देत
नाही, असे भुमरे म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

2024 मध्ये आमचाच खासदार

औरंगाबाद मतदारसंघातून 2024 (Aurangabad Lok Sabha Constituency) मध्ये कोण निवडून येणार हे वेळच ठरवेल. या निवडणुकीला अद्याप दीड वर्ष बाकी आहे. भविष्यात कोण लढणार, कोण कोणाशी युती करणार यावर सगळं अवलंबून आहे. औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचा (Balasaheb Thackeray Party) खासदार होणार, हे मी ठामपणे सांगतो असे म्हणत भुमरे यांनी चंद्रकांत खैरेंना आव्हान दिले. (Maharashtra Politics)

 

खैरेंनी जिल्हा आणि शहराची वाट लावली

चंद्रकांत खैरे यांची अवस्था बिकट आहे. माध्यमं त्यांच्याकडे जातात. माध्यमं वगळली तर त्यांना कोणीच ओळखत नाही. मतदार देखील विचारत नाहीत. चंद्रकांत खैरेंवर मतदारांचा विश्वास नाही. त्यांनी जिल्हा आणि शहराची वाट लावली आहे. याच कारणामुळे औरंगाबाद शहराचे हे हाल झाल्याची टीका संदिपान भुमरे यांनी केली.

 

खैरे पुढारी आहेत का

खैरे यांनी जिल्ह्याकडे, शहराकडे लक्ष दिले असते तर पाणी मिळाले असते, रस्ते झाले असते,
शहर स्वच्छ झाले असते. याठिकाणी पर्यटकांची संख्या देखील कमी झाली आहे. खैरेंनी एकही काम केलेले नाही.
त्यांनी फक्त जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचे काम केले. खैरे हा काय पुढारी आहे का.
खैरे हा जाती-जातीत भांडण लावून पुढारी झालेला आहे, असा गंभीर आरोप संदिपान भुमरे यांनी केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Politics | ‘Balasaheb Thackeray’s MP will be in Aurangabad, Chandrakant Khair has started a caste-jeet conflict’, the leader of the Shinde group has made a serious allegation.

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | मार्केटयार्डमध्ये पिस्तुलाचा धाक दाखवून 28 लाख रुपये लुटणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त रितेश कुमार यांची 5 वी कारवाई

Nitin Deshmukh | किरीट सोमय्या यांच्यावर नितीन देशमुख यांची खालच्या भाषेत टीका; म्हणाले…

Anil Desai | ‘उद्या शिंदे गटाचे वकील मीच मुख्य नेता असल्याचे म्हणतील..,’ अनिल देसाई यांची शिंदे गटावर टीका

 

Related Posts