IMPIMP

Maharashtra Politics | NCP च्या महिला नेत्याचा BJP मध्ये प्रवेश, बारामतीमध्येच शरद पवारांना मोठा धक्का!

by nagesh
NCP Chief Sharad Pawar | sharad pawar reaction on devendra fadnavis claims of morning oath with ajit pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Maharashtra Politics | राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या सातारा जिल्हा महिला आघाडीच्या (Satara District Women’s Alliance) माजी जिल्हा निरीक्षक डॉ. अर्चना पाटील (Dr. Archana Patil) यांनी भाजपामध्ये (BJP) प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत मुंबईतील पक्ष कार्यालयात अर्चना पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. (Maharashtra Politics)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर डॉ. पाटील म्हणाल्या, भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. ओबीसींना भाजपाने न्याय दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) ओबीसींचे आरक्षण (OBC Reservation) घालवले. परंतु भाजपची सत्ता येताच ओबीसींना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामुळे आरक्षण मिळाले.

डॉ. अर्चना पाटील या इंदापूर तालुक्यातील लासूर्णे गावच्या आहेत.
डॉ. अर्चना पाटील यांचे आजोबा दिनकरराव पाटील यांचा माजी खासदार शंकरराव पाटील (Shankarao Patil)
यांच्या विरोधात विधानसभेला थोड्या मताने पराभव झाला होता.
अर्चना पाटील यांच्या प्रवेशाने हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांना बळ मिळणार आहे. (Maharashtra Politics)

अर्चना पाटील यांनी 2 वर्षांपूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
त्यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट सातारा जिल्हा निरीक्षकपदी डॉ. अर्चना पाटील यांची नियुक्ती केली होती.
यापूर्वी पाटील यांनी महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या रासपचे प्रदेश सचिव म्हणून काम केले आहे.
डॉ. पाटील इंदापूर तालुक्यासह बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency) ओबीसी समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जातात.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Maharashtra Politics | big setback to sharad pawar ncp baramati leader dr archana patil joins bjp in presence of chandrashekhar bawankule

हे देखील वाचा :

RBI Hike Repo Rate | सणासुदीपूर्वी RBI चा पुन्हा झटका, रेपो रेट 0.50 टक्के वाढला, कर्ज महागले

Pune PMC News | आनंदनगर झोपडपट्टीतील नागरिकांचे हिलटॉप हिलस्लोपवरील इमारतीत बेकायदा पुर्नवसन; महापालिकेने इमारतीच्या मालकाला बजावली नोटीस : रविंद्र बिनवडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त

Pune Crime | माजी नगरसेवक दीपक मिसाळ यांना धमकावुन खंडणी मागणार्‍याने तरुणीचे अश्लिल फोटो व्हायरल करुन केली बदनामी

Related Posts