IMPIMP

Maharashtra Politics | ‘उद्या मुख्यमंत्री आमच्या एन्काऊंटरचे आदेश देऊ शकतील…’ राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

by nagesh
 Maharashtra Politics | cm eknath shinde can even order our encounter tomorrow ncp leader anand paranjpe allegation

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन  Maharashtra Politics | राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ठाणे पोलिस आयुक्त जयजीत सिंग, अतिरिक्त पोलिस आयुक्त पंजाबराव उगले, पोलिस उपायुक्त गणेश गावडे आणि अमरसिंह जाधव हे सत्ताधाऱ्यांची प्रायव्हेट आर्मीसारखे कामे करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि माजी महापौर नरेश म्हस्के हे पोलिस आयुक्त सिंग यांना आपला एन्काऊंटर करण्याचा आदेश देतील आणि पोलिस आयुक्तही खुर्चीवरून उठून आदेश पाळण्याची ग्वाही देतील, असा गंभीर आरोप आनंद परांजपे (Anand Paranjape) यांनी केला आहे, ते आज (दि.१४) पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांवर केला. (Maharashtra Politics)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्याच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान अध्यक्षांबाबत अक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सभागृहातून निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठाण्यात आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर या कार्यकर्त्यांविरोधात ठाणे पोलिस आयुक्तालय परिक्षेत्रातील ११ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. याप्रकरणी न्यायालयाने अटक करू नये असे आदेश दिले असून, त्यावरील पुढील सुनावणी १८ जानेवारीला होणार आहे. घटनाबाह्य शिंदे सरकारचा विरोध केल्यास ठाणे पोलीस राजकीय कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत, असा आरोपही परांजपे यांनी केला. आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालमीत घडलेले आहोत. त्यामुळे आम्ही अजिबात घाबरत नाही. गोळी घालायची असेल तर छातीत घाला. पाठीवर घालू नका. कारण, मी डोळ्यात डोळे घालून आंदोलन करणारा कार्यकर्ता आहे. माझी लढाई या घटनाबाह्य सरकारच्या विरोधात अशीच सुरूच राहिलं. असे देखील यावेळी बोलताना आनंद परांजपे म्हणाले. (Maharashtra Politics)

 

त्यांनी यावेळी बोलताना पोलिसांवर देखील चांगलाच घणाघात केला. तुम्ही जनतेचे सेवक आहात की तुमच्या राजकीय मालकांचे? असा प्रश्न विचारला. आज मुख्यमंत्री शिंदे आहेत. उद्या राज्यकर्ते बदलतील. पण, बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान आणि कायद्याचे राज्याचं निरंतर राहणार आहे. असे देखील ते यावेळी म्हणाले.

 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार देणाऱ्या रिदा रशीद
यांच्यावर हाणामारी आणि ठार मारण्याची धमकी. एट्रोसिटी ऍक्ट आणि लहान मुलीकडून वेश्याव्यवसाय
करून घेण्याचा अर्थात पीटा आणि पॉक्सोसारखा अत्यंत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्या हिवाळी अधिवेशनात आणि मंत्रालयात फिरतात. तरीही त्या पोलिसांना दिसत नाही.
आणि त्यांच्यावर अटकेची कारवाई होत नाही. तसेच मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल असलेले विकास रेपाळे
आणि नम्रता भोसले मुक्तपणे संचार करीत आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करायला ठाणे पोलिस
तयार नाहीत. असा आरोप देखील यावेळी बोलताना परांजपे यांनी केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Politics | cm eknath shinde can even order our encounter tomorrow ncp leader anand paranjpe allegation

 

हे देखील वाचा :

Shinde-Fadnavis Govt | पुणे महापालिकेच्या विकासकामांच्या उदघाटन, भूमीपूजनावरून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडवणीस यांच्यात बेबनाव?; CM शिंदेंनी ऐनवेळी पुणे दौरा रद्द केल्याने राजकिय वर्तुळात चर्चा सुरू

Shweta Sharma | अभिनेत्री श्वेता शर्माच्या ‘त्या’ डान्स व्हिडिओवर चाहते घायाळ

Pune Police News | पोलिसिंगमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार्‍या पुणे पोलिसांना सर्वोत्कृष्ट पोलिस घटक पारितोषिक

 

Related Posts