IMPIMP

Maharashtra Politics News | भगवान गडावर राजकीय वाद, पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यात खडाजंगी

by nagesh
Maharashtra Politics News | bhagwangad pankaja munde namdev shastri and dhananjay munde at same stage

पाथर्डी : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics News | महाराष्ट्रातील हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान गडाच्या (Bhagwan Gad) 89 व्या फिरत्या नारळी सप्ताहाला महंत नामदेव शास्त्री (Mahant Namdev Shastri) यांच्या उपस्थित सुरुवात झाली. पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी गावात हा कार्यक्रम झाला. यावेळी (Maharashtra Politics News) नामदेव शास्त्री, पंकजा मुंडे (Pankaja Munde), धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे उपस्थित होते. यावेळ नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना न भांडण्याचा सल्ला दिला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नामदेव शास्त्री म्हणाले, पंकजा मुंडे यांच्यासोबत माझं वैर नाही, त्यांचे चमचे खराब आहेत. पंकजांनी अहंकार कमी करावा, स्वाभीमान ठेवा, अहंकार सोडा, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच दोघंही मुंडे घराण्यासाठी आणि समाजासाठी महत्त्वाचे असल्याचे नामदेव शास्त्री यांनी म्हटले.

 

नामदेव शास्त्री यांनी सल्ला दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं.
माझ्या बोलण्याला माझ्या उंचपुऱ्या व्यक्तीमत्वाला आणि लाखोंच्या जनसमुदायात बोलताना मोठा आवाज केला तर
त्याला अहंकार समजू नका अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले.
स्त्री बोलली तर तर तो अहंकार आणि एखादा पुरुष कितीही चुकीचा असला आणि तो बोलला तर त्याला वाघ
समजायचं ही तुमची मानसिकता आहे का? असा सवाल पंकजा मुंडे यांनी विचारला.

मागील काही काळापासून नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात वाद झाले आहेत.
सात वर्षानंतर पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Maharashtra Politics News | bhagwangad pankaja munde namdev shastri and dhananjay munde at same stage

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | ‘मी चंद्रकांत पाटलांशी बोललो… त्यांची बाळासाहेबांबद्दल भूमिका स्पष्ट आहे’, चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया (व्हिडिओ)

NCP Chief Sharad Pawar | सहकारी पक्षांशी चर्चा न करता उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, त्यामुळे..; शरद पवारांचे मोठे वक्तव्य

Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | पहिली ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा; स्पार्टन्स क्रिकेट क्लब संघाला विजेतेपद !!

 

Related Posts