IMPIMP

CM Eknath Shinde | ‘मी चंद्रकांत पाटलांशी बोललो… त्यांची बाळासाहेबांबद्दल भूमिका स्पष्ट आहे’, चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया (व्हिडिओ)

by nagesh
CM Eknath Shinde | cm eknath shinde clarrification on bjp chandrakant patil controversial statement on babri masjid demolition

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाईन   बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) किंवा शिवसेनेचा (Shiv Sena) बाबरी पाडण्याशी (Babri Masjid) कोणताही संबंध नव्हता असा दावा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला होता. यावरुन राष्ट्रवादी (NCP) आणि ठाकरे गटाकडून चंद्रकांत पाटलांवर टीका केली जात आहे. याच दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी चंद्रकांत पाटील यांच्याशी बोललो आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट आहे. त्यांचा रोख आताच्या माजी मुख्यमंत्र्यांकडे (उद्धव ठाकरे-Uddhav Thackeray) आहे. बाबरी मशीद पाडली तेव्हा ते कुठे होते? असे चंद्रकांत पाटील यांना म्हणायचे असल्याचे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अवकाळी पावसामुळे नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पारनेर तालुक्यातील आळकुटी येथे आले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांनी त्यांना चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला होता.

 

 

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मी चंद्रकांत पाटील यांच्याशी बोललो, त्यांचं म्हणणं होतं की, बाबरी पाडली त्यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत (Sanjay Raut) कुठे होते? बाळासाहेबांबाबत त्यांची भूमिका स्पष्ट आहे. ज्यावेळी अयोध्येत बाबरी मशीदीचा वादग्रस्त भाग पाडला त्यावेळी स्वत: बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांबाबत उद्गार काढले की मला शिवसैनिकांचा (Shiv Sainik) अभिमान आहे, हे जगजाहीर आहे. त्याचवेळेस ‘गर्व से कहो हम हिंदू है’चा नाराही बाळासाहेबांनी दिला.

 

 

त्या केस संदर्भात लखनऊ कोर्टात (Lucknow Court) बाळासाहेब ठाकरे गेले होते. तिथं लालकृष्ण आडवाणी
(LK Advani), बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल (Ashok Singhal), उमा भारती (Uma Bharti) हे सर्वजण होते.
त्यावेळी पक्षबिक्ष काहीही नव्हता, सगळे केवळ रामभक्त होते. त्यावेळी बाळासाहेबांनी परखड भूमिका घेतली होती,
हे सर्वांना जगजाहीर आहे. त्यानंतर मुंबईत जी दंगल (Mumbai Riots) उसळली,
तेथे बाळासाहेब नसते तर काय झालं असतं, मुंबईकरांचं त्यांनी रक्षण केलं.
राज्यावर, देशावर ज्या ज्या वेळी संकट आली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी परखड भूमिका घेतली.
मग ती सावरकरांबाबत असो किंवा हिंदुत्वाची असो किंवा देशहिताची असो, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आता जे लोक बोलत आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (Swatantra Veer Savarkar) अपमान मूग गिळून गप्प बसून सहन केला जात आहे. ज्यांनी राम मंदिराला (Ram mandir) विरोध केला, ज्यांनी सावरकरांचा अपमान केला, त्यांच्याबरोबरच हे फिरत आहेत, असा आरोप शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला. अयोध्येत राम मंदिर आणि जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचे स्वप्न शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे होते. हे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah)यांनी पूर्ण केल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

Web Title :-  CM Eknath Shinde | cm eknath shinde clarrification on bjp chandrakant patil controversial statement on babri masjid demolition

 

हे देखील वाचा :

NCP Chief Sharad Pawar | सहकारी पक्षांशी चर्चा न करता उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, त्यामुळे..; शरद पवारांचे मोठे वक्तव्य

Congress Mohan Joshi | लेखणीने त्यांच्या दाखवली समतेची वाट, फुलेंच्या कार्याने उगवली परिवर्तनाची नवी पहाट – मोहन जोशी

Indian Doctors Premier League T20 Cricket | पहिली ‘इंडियन डॉक्टर्स प्रिमिअर लीग’ टी-२० क्रिकेट स्पर्धा; दिल्ली चॅम्पियन संघाला विजेतेपद !!

 

Related Posts