IMPIMP

NCP Chief Sharad Pawar | सहकारी पक्षांशी चर्चा न करता उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, त्यामुळे..; शरद पवारांचे मोठे वक्तव्य

by nagesh
Maharashtra Political News | if sharad pawar and ajit pawar come with bjp we are ready to welcome them says sudhir mungantiwar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सहकारी पक्षांना विचारात घेतलं नाही. त्यांनी सहकारी पक्षांना विचारात घ्यायला पाहिजे होतं, असं राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अदानी प्रकरणात (Adani Case) जेपीसी (JPC), पहाटेचा शपथविधी, फडतूस-काडतूस यावरुन रंगलेले राजकारण आणि इतर मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी राजकीय नेत्यांना सल्ला देताना त्यांचे कान टोचले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यावेळी चर्चा झाली नाही

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले, मविआ सरकार (Maha Vikas Aghadi Government) तीन पक्षांची संख्या एक करुन तयार झाले होते. सरकारमध्ये तिन्ही पक्षांचा सहभाग होता. त्यात कुणी जर राजीनामा देत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, अन्य सहकारी पक्षांशी संवाद साधणे आवश्यक होते. चर्चा न करता निर्णय घेणे याचे दुष्परिणाम होतात. दुर्दैवाने त्यावेळी ही चर्चा झाली नाही ही वस्तूस्थिती टाळता येत नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.

 

 

ठाकरे-फडणवीसांचे कान टोचले

राजकीय आरोप प्रत्यारोपात फडतूस-काडतूसवरुन भाजप-ठाकरे गटात आरोप प्रत्यारोप होत आहेत.
यावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. मला महाराष्ट्राची संस्कृती, येथील लोकांची मानसिकता माहिती आहे.
वैयक्तिक हल्ले टाळा, राजकीय मुद्दे घ्या, लोकांचे प्रश्न घ्या. वैयक्तिक टीका-टिप्पणी, चिखलफेक होऊ नये.
हे टाळण्याचे काम जाणीवपूर्वक केले पाहिजे, असा सल्ला देत शरद पवार यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे कान टोचले.

 

 

तर विरोध करणार नाही

अदानी प्रकरणात जेपीसीसंदर्भात शरद पवार यांचे सूर बदलल्याचे दिसत आहेत.
सहकाऱ्यांना जेपीसी आवश्यक वाटत असेल तर विरोध करणार नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.
मित्राचं मत माझ्यापेक्षा वेगळं आहे. मात्र आम्हाला यात ऐक्य ठेवायचं आहे. माझं मत मी मांडलं.
पण सहकाऱ्यांना वाटत असेल की जेपीसी पाहिजे, तर मी त्याला विरोध करणार नाही.
त्यांच्या मताशी सहमत नाही पण विरोधकांची एकीवर दुष्परिणाम होऊ देणार नाही. याबाबतीत आम्ही आग्रह धरणार नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | sharad pawar exclusive interview uddhav thackeray needed to hold dialogue with fellow parties while resigning says sharad pawar

 

हे देखील वाचा :

Congress Mohan Joshi | लेखणीने त्यांच्या दाखवली समतेची वाट, फुलेंच्या कार्याने उगवली परिवर्तनाची नवी पहाट – मोहन जोशी

Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | पहिली ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा; स्पार्टन्स क्रिकेट क्लब संघाला विजेतेपद !!

Indian Doctors Premier League T20 Cricket | पहिली ‘इंडियन डॉक्टर्स प्रिमिअर लीग’ टी-२० क्रिकेट स्पर्धा; दिल्ली चॅम्पियन संघाला विजेतेपद !!

Chandrakant Patil | ‘बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात श्रद्धा, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला’, ‘त्या’ विधानावरुन चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण (व्हिडिओ)

 

Related Posts