IMPIMP

Maharashtra Politics News | जर शिंदे-ठाकरे एकत्र येण्यासाठी चंद्रकांत पाटील पुढाकार घेतला तर…, जितेंद्र आव्हाडांचं मोठं वक्तव्य

by nagesh
 Maharashtra Politics News | jitendra awads reaction on eknath shinde uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   Maharashtra Politics News | आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख
शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची भेट घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये (Yashwantrao Chavan Centre) आले होते. यावेळी
बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव
ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकत्र आणण्यासाठी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) प्रयत्न करणार असतील तर आम्ही त्याचं स्वागतच
करु, चांगल्या गोष्टीला आमचं समर्थन (Maharashtra Politics News) असल्याचं आव्हाड यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी रोशनी शिंदे प्रकरणावरुन (Roshni Shinde Case) एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवला. जे-जे विद्रोही आहेत, परिस्थितीविरोधात उभे राहून झगडत आहेत, त्यांची कुठलीही लढाई असो त्यांच्या मागे (Maharashtra Politics News) उभे राहणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितलं. गंभीर आरोप करताना आव्हाड यांनी काही प्रश्न उपस्थित केले. रोशनी शिंदे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहीली म्हणून त्यांना मारण्यात आलं. तिच्या पोटावर लाथा मारण्यात आल्या तिला आई होण्यापासून रोखणे योग्य आहे का? असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला.

 

दरम्यान आव्हाड यांनी ट्विट करुन रॅप गाणे तयार करणाऱ्या उमेश खाडे (Umesh Khade) आणि त्याच्या आई वडीलांना पोलिसांनी डांबून ठेवल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, “भोंगळी” हे रॅप गाणे तयार करणारा तरुण कलाकार उमेश खाडे आणि त्याच्या आई-वडीलांना वडाळा पोलीस स्टेशनमध्ये (Wadala Police Station) डांबून ठेवले आहे. या गाण्यामध्ये आक्षेपार्ह असे काहीच नाही. त्याने कोणाचेही नाव घेतलेले नाही.

 

 

आपल्या गरीबीवर तो या गाण्यामध्ये व्यथीत होऊन बोलला आहे. आता व्यथा व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल, तर मग कामावर जाणारे आणि ट्रेनमध्ये आपल्या व्यथा मांडणा-या प्रत्येकालाच अटक करा. असे किती जणांना तुम्ही अटक करणार आहात. तुम्ही लोकांच्या भावना अश्याप्रकारे दाबू शकत नाही. हे पोलीसी राज नाही. लोकशाहीमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही असे आपल्याला चिरडू देणार नाही. उमेश खाडेला लगेच सोडा.

 

पोर-पोरींनो व्यक्त व्हा… फासा लटकवणार का … मी कायम तुमच्या बरोबर आहे .. आपला गळा दाबत आहे. तुकाराम जेल मध्येच बसले असते. ह्यानी तर नामदेव ढसाळ (Namdev Dhasal) ह्यांना आयुष्य भर जेल मध्ये बसवले असते. विद्रोह हा महाराष्ट्राच्या अणुरेणूत आहे, असे आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Politics News | jitendra awads reaction on eknath shinde uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Birsa Munda Krushi Kranti Yojana Pune Maharashtra | बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेचा 50 शेतकऱ्यांना लाभ

ACB Arrest PWD Executive Engineer | सार्वजनिक बांधकाम विभागातील मोठा मासा अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात ! घटनास्थळी लाच रक्कमेव्यतिरिक्त 6 लाख 40 हजार मिळाले

Pune Crime News | खेड : पुर्ववैमनस्यातून 6 जणांकडून युवकाचा धारदार हत्याराने सपासप वार करून खून

 

Related Posts