IMPIMP

Maharashtra Politics | ठाकरे गटाची वाढणार चिंता! तीस-तीस घोटाळ्यात ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचे नाव

by nagesh
 Uddhav Thackeray | 50 khoke slogan reached at jammu and kashmir says shivsena leader uddhav thackeray in thane

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  नुकतीच एक बातमी समोर आली आहे. त्याने ठाकरे गटाची चिंता वाढणार असल्याचे बोलले जात आहे. (Maharashtra Politics) राज्यात गेल्यावर्षी गाजलेल्या तीस-तीस घोटाळ्यात ठाकरे गटाच्या एका बड्या नेत्याचे नाव समोर आले आहे. विशेष म्हणजे ईडीकडून या घोटाळ्याबाबतची माहिती देखील मागविल्याचे बोलले जात आहे. (Maharashtra Politics) या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेला संतोष राठोड याच्याकडे तीन डायऱ्या मिळाल्या होत्या. त्यात राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता याप्रकरणी ठाकरे गटाच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्यातील बहुचर्चित तीस-तीस घोटाळ्याची माहिती ईडीकडून मागविण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यातच आता या प्रकरणात अंबादास दानवे यांचे नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांना या प्रकरणात तीन डायऱ्या मुख्य आरोपी संतोष राठोडकडे सापडल्या होत्या. ज्यामध्ये पैसे गुंतवणूक करण्यात आलेल्या लोकांची नावे आहेत. याच नावांच्या यादीत अंबादास दानवे यांचे देखील नाव असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. तसेच जर या प्रकरणात ईडीकडून चौकशी करण्यात आली तर दानवे यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Maharashtra Politics) त्यामुळे आता महाविकास आघाडीतील आणखी एक नेता ईडीच्या गळाला लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

या आरोपांवर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, ‘ त्या डायरीमध्ये माझं नाव नाही. तो दुसरा कोणीतरी दानवे असेल.’ असे म्हणत दानवेंनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले.

 

एका वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, पुढील गुंतवणूकदारांची नावे त्यांच्या हाती लागली आहेत.
ज्यात एका मंत्र्याचा नातेवाईक, एक आमदार, एक डीवायएसपी, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक,
चार पोलीस कर्मचारी, दहा शिक्षक, परभणी जिल्ह्यातील एक माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक,
कन्नड तालुक्यातील एक नगरसेवक, औरंगाबाद जिल्ह्यातील दोन सरपंच (एक सरपंच पती),
दोन माजी जिल्हा परिषद सदस्य, एक पंचायत समिती सदस्य, एक ग्रामपंचायत सदस्य, एक शासकीय कंत्राटदार,
तीन वाळू व्यावसायिक, एक पोलीस पाटील, एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष, पाटबंधारे विभागाचा एक अधिकारी,
एक बँक कर्मचारी आणि चार हॉटेल चालक यांची नावं आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तसेच त्यासोबत काही राजकीय मंडळींची देखील यात नावे आहेत.
ज्यात माजी पंचायत समिती सदस्य कृष्णा भानुदास चव्हाण,
भाऊसाहेब तरमळे (राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष), मनोज पेरे (शिवसेना (ठाकरे गट, पैठण तालुकाध्यक्ष),
राजू प्रल्हाद राठोड (शिवसेना पदाधिकारी), विजय अंबादास चव्हाण (राष्ट्रवादी नेते,
माजी जिल्हापरिषद सदस्य),चंद्रकांत नामदेवरा राठोड (नगराध्यक्ष सोनपेठ परभणी) यांच्यासह अनेकांची
नावं आहेत. त्याच यादीत अंबादास दानवे यांचे नाव आढळून आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

 

Web Title :- Maharashtra Politics | opposition leader ambadas danve s name in thirty thirty scam information sought by ed

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील योगेश जगधने व त्याच्या 3 साथीदारावर ‘मोक्का’

Mhada Lottery 2023 | म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केलाय? तर चुकवू नका ‘या’ तारखा

Gold Rate Today | सोन्याच्या दराचे रेकॉर्ड ब्रेक! सोन्याच्या दराचा आणखी एक नवा रेकॉर्ड, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे दर

 

Related Posts