IMPIMP

Mhada Lottery 2023 | म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केलाय? तर चुकवू नका ‘या’ तारखा

by nagesh
Mhada Lottery 2023 | important dates apply process pune mhada lottery 2023 news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – म्हाडाने मुंबई, पुणे आणि नागपूर या तिन्ही उत्पन्न गटासाठी लॉटरी जाहीर केली आहे.( Mhada Lottery 2023) यासाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात देखील झाली आहे. म्हाडाकडून या वर्षीच्या लॉटरीसाठी अनेक गोष्टी बदलण्यात आल्या आहेत. ( Mhada Lottery 2023) या संपूर्ण लॉटरी प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमी व्हावा या दृष्टीने याबाबतची सर्व प्रक्रिया ही कंप्यूटरबेस पध्दतीने राबविण्यासाठी प्रयत्न म्हाडाकडून केले जाणार आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एकट्या पुण्यात ५ हजारांहून अधिक घरांसाठी लॉटरी निघाली आहे. त्यातमधील २ हजार घरे ही प्रथम येणाऱ्यास दिली जाणार आहेत. त्यामुळे या तारखा तुम्ही चुकूनही चुकवू नका. याशिवाय नागपूर आणि मुंबईतून देखील अर्ज दाखल करणाऱ्यांनी सुध्दा या तारखा लक्षात ठेवायच्या आहेत. ( Mhada Lottery 2023)

 

५-६ जानेवारीपासून म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळ housing.mhada.gov.in यावर अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. या साईटवर तुम्हाला अगोदर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. त्यानंतर लॉटरीसाठी आवश्यक असलेली ७ कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. नंतर अर्ज भरून झाला की तुम्हाला तेथे पेमेंट करावे लागणार आहे.

 

३०० ते ६०० चौरस फूटांपर्यंत ही घरं आहेत. म्हाडाकडून वेगवेगळ्या उत्पन्न गटांसाठी ही लॉटरी काढण्यात येणार आहे. ही लॉटरी पूर्णपणे ऑनलाइन असणार आहे. जी सिस्टिमद्वारे असेल. यामध्ये मानवी हस्तक्षेप कुठेही होणार नाही. याशिवाय नागपूर महानगर आणि मुंबईसाठी देखील म्हाडाने लॉटरीच्या सूचना काढल्या आहेत. यासंदर्भातील अधिक माहिती म्हाडाच्या साईटवर देखील तुम्हाला मिळणार आहे.

 

कोणती कागदपत्रे लागणार?

अर्ज करणाऱ्यांसाठी तुमचा रहिवासी दाखला, उत्पन्न, पॅन कार्ड, आधार कार्ड, 15 वर्ष महाराष्ट्रात रहात असल्याचा पुरावा आणि कोट्यातून घर घेत असाल तर त्यासंबंधित कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे. या कागदपत्रांच्या पडताळणीनंतरच पुढची प्रक्रिया केली जाईल. ( Mhada Lottery 2023)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कोणत्या तारखा महत्त्वाच्या?

तुम्ही पुणे म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करत असाल तर तुम्ही या तारखा अजिबात चुकवू नका.
कारण या तारखा महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या तारखा कोणत्या आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. ( Mhada Lottery 2023)

 

६ जानेवारी- रजिस्ट्रेशन आणि अर्ज करण्यासाठी सुरुवात

७ जानेवारी- पेमेंटची सुरुवात

५ फेब्रुवारी – अर्ज करण्याचा शेवटचा दिवस

६ फेब्रुवारी- ऑनलाइन पेमेंटचा शेवटचा दिवस

६ फेब्रुवारी- NEFT पेमेंटचा शेवटचा दिवस

१३ फेब्रुवारी – ड्राफ्ट अॅप्लिकेशन पब्लिश

१५ फेब्रुवारी- फायनल अॅप्लिकेशन

१७ फेब्रुवारी – लॉटरी ड्रॉ

२० फेब्रुवारी – रिफंड

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Mhada Lottery 2023 | important dates apply process pune mhada lottery 2023 news

 

हे देखील वाचा :

Gold Rate Today | सोन्याच्या दराचे रेकॉर्ड ब्रेक! सोन्याच्या दराचा आणखी एक नवा रेकॉर्ड, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे दर

Nagpur Crime News | नागपूर हादरलं ! कचरा वेचणाऱ्यांमध्ये पैशावरून झालेल्या वादातून तरुणाची हत्या

Sanjay Raut | ‘तर मिठी नदीत प्रेतं तरंगताना दिसली असती..,’ मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर संजय राऊत यांचे सत्ताधाऱ्यांना खडे बोल

 

Related Posts