IMPIMP

Pune Crime News | पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील योगेश जगधने व त्याच्या 3 साथीदारावर ‘मोक्का’

by nagesh
 Pune Crime News | Mokka - MCOCA action on Yogesh Jagadhan and his 3 accomplices from Bibvewadi area of Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पुणे शहरातील बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या (Bibwewadi Police Station) हद्दीत दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार योगेश रमेश जगधने याच्यासह त्याच्या 3 साथीदारांवर मोक्का कारवाई (MCOCA Action) Mokka केली आहे. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी आजपर्यंत 4 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे. ( Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

टोळी प्रमुख योगेश रमेश जगधने (वय-26 रा. शेंडकर चाळ, बिबवेवाडी), टोळी सदस्य उमेश रमेश जगधने (वय-31 रा. पापळ वस्ती, बिबवेवाडी), विकास उर्फ सोन्या गंगाराम राठोड (वय-23 रा. बिबवेनगर, बिबवेवाडी) आणि एका अल्पवयीन मुलावर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. आरोपींवर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात 307,323,504,506,34, महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act), आर्म अॅक्ट (Arm Act) अन्वये गुन्हा दाखल असून तीन जणांना अटक केली आहे.आरोपी येरवडा मध्यवर्ती कारागृहात (Yerwada Central Jail) आहेत. तर त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. (Pune Crime News)

 

अटक करण्यात आलेल्या आरोपींवर दरोडा घालणे (Robbery), दरोड्याची तयारी, धारदार हत्याराने दुखापत करणे, घातक शस्त्रचा धाक दाखवून जबरी चोरी करणे, जीवे ठार मारण्याची धमकी (Threats to Kill) देणे असे गंभीर गुन्हे (FIR) बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी पुन्हा गंभीर गुन्हे केले आहेत.

 

बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा (मोक्का)
अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगिता जाधव
(Senior Police Inspector Sangita Jadhav) यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ -5 विक्रांत देशमुख
(DCP Vikrant Deshmukh) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा
(Addl CP Ranjan Kumar Sharma) यांना सादर केला होता.
या प्रकरणाची छाननी करुन टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पौर्णिमा तावरे (ACP Purnima Taware) करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख,
सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगिता जाधव,
पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर (Police Inspector Anita Hivarkar),
पोलीस उपनिरीक्षक विवेक सिसाळ (PSI Vivek Sisal), विक्रांत डिगे (PSI Vikrant Digge),
सहायक पोलीस उपनिरीक्षक राजकुमार बारबोले, तसेच सर्व्हेलन्स पथकातील पोलीस अंमलदार दैवत शेडगे,
अनिल डोळसे यांनी केली आहे.

 

Web Title :- Pune Crime News | Mokka – MCOCA action on Yogesh Jagadhan and his 3 accomplices from Bibvewadi area of Pune

 

हे देखील वाचा :

Mhada Lottery 2023 | म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केलाय? तर चुकवू नका ‘या’ तारखा

Gold Rate Today | सोन्याच्या दराचे रेकॉर्ड ब्रेक! सोन्याच्या दराचा आणखी एक नवा रेकॉर्ड, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे दर

Sanjay Raut | ‘तर मिठी नदीत प्रेतं तरंगताना दिसली असती..,’ मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर संजय राऊत यांचे सत्ताधाऱ्यांना खडे बोल

 

Related Posts