IMPIMP

Maharashtra Politics | शिंदे गटातील खासदाराचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘महाविकास आघाडीचे लोक रात्री-बेरात्री मुख्यमंत्र्यांना…’

by nagesh
Maharashtra Politics | prataprao jadhav claim that mahavikas adghadi leader meet cm eknath shinde

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटातील समर्थक खासदार प्रताप जाधव (Pratap
Jadhav) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीचे लोक रात्री-बेरात्री मुख्यमंत्री शिंदे यांना भेटतात, असे प्रताप जाधव (Pratap Jadhav) म्हणाले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यांच्या या दाव्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्यात अगोदरच सुप्रिया सुळे आणि अब्दुल सत्तार वाद सुरु आहे. शिंदे गटाचे समर्थक आमदार आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत टीका केली होती. त्यामुळे राज्यात सध्या राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यात आता बुलढाण्याचे खासदार प्रताप जाधव यांनी नवा वाद सुरु केला आहे.

 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदारच नाहीत, तर अनेक खासदार देखील अस्वस्थ आहेत. ते सर्वजण मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत आहेत. तसेच त्यांच्यापैकी अनेकजण आमच्या मंत्र्यांची देखील सह्याद्रीवर जाऊन भेट घेत आहेत. मी या सर्वाचा स्वत: साक्षीदार आहे, असेही प्रताप जाधव म्हणाले.

 

यापूर्वी देखील जाधवांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप
केले होते. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) हे दर महिन्याला मातोश्रीवर 100 खोके
पोहोचवित होते. हे लोक मुंबईतील बार मालकांकडून महिन्याला वसुली करत होते.
आणि ते पैसे मातोश्रीवर पोहोचवित होते, असे आरोप जाधव यांनी केला होता.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि सचिन वाझे सध्या या पैश्यांच्या अफरातफरी प्रकरणात तुरुंगात आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Maharashtra Politics | prataprao jadhav claim that mahavikas adghadi leader meet cm eknath shinde

 

हे देखील वाचा :

Jitendra Awhad | ठाण्यातील ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा प्रयोग बंद पाडल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांची नोटीस

Maharashtra Politics | हे कसले महानाट्य? हा तर महाराष्ट्राच्या माथी दिल्लीने मारलेला महादळबद्री प्रयोग

Kapil Patil | कपिल पाटलांचे वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘देशातील नागरिकांना वेळीच जाग आली नाही तर भारताच्या राष्ट्रध्वजावर एक दिवस…’

 

Related Posts