IMPIMP

Maharashtra Politics | मंत्री उदय सामंतांना आगामी निवडणूक सोपी नाही, शिवसेना उभे करू शकते राजन साळवींचे आव्हान?

by nagesh
Maharashtra Politics | thackeray group is trying to challenge rajan salvi in front of uday samant in ratnagiri sangameshwar constituency

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – आगामी लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) सर्वच पक्षांनी (Maharashtra Politics) आतापासूनच चाचपणी सुरू केली आहे. शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shivsena) केलेल्या आमदारांना आगामी निवडणुकीत धडा शिकवण्यासाठी शिवसेनेतही हालचाली सुरू झाल्याचे (Maharashtra Politics) दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात उदय सामंत (Uday Samant) यांच्याविरोधात राजन साळवी (Rajan Salvi) उभे राहिल्यास उदय सामंत यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. त्यामुळे राजन साळवी यांना येथून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राजन साळवी हे मुंबईत रहात असले तरी ते मूळचे रत्नागिरीतील (Ratnagiri District) आहेत. शिवसेनेच्या बांधणीसाठी राजन साळवी यांनी घेतलेली मेहनत, कार्यकर्त्यांची असलेली फौज आणि दांडगा जनसंपर्क या राजन साळवी यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे राजन साळवी हे उदय सामंत यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करु शकतात. सामंत यांच्या बंडखोरीनंतर साळवी यांना उमेदवारी द्यावी, असे सांगणारा मोठा वर्ग या भागात आहे. जर राजन साळवी विरूद्ध उदय सामंत असा सामना आगामी विधासभेला रंगला तर सामंत यांना ही लढत कठीण ठरू शकते.

 

सध्या लांजा-राजापूर मतदारसंघात (Lanja-Rajapur Constituency) शिवसेनेतील अंतर्गत घडामोडी देखील वेगाने घडत आहेत.
नाना पटोले (Nana Patole) यांच्या दौर्‍यानंतर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस (Congress) सक्रिय होत असल्याची चर्चा आहे.
शिवाय राजन साळवी यांच्या विरोधात नाणार रिफायनरीच्या (Nanar Refinery) मुद्द्यावरुन काही प्रमाणात नाराजी आहे.
या पार्श्वभूमीवर लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघातून साळवी यांना निवडणूक जड जाऊ शकते.

 

शिवाय लांजा-राजापूर मतदार संघातील काँग्रेसचे 2019 मधील उमेदवार अविनाश लाड (Avinash Lad)
देखील सध्या सक्रिय झाले आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करता राजन साळवी यांची रत्नागिरीतील ताकद पाहता
ते सामंत यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करु शकतात.
त्यामुळे सध्या ठाकरे गट उदय सामंत यांच्यासमोर साळवी यांचे आव्हान उभे करण्याच्या प्रयत्नत असल्याची चर्चा आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title – Maharashtra Politics | thackeray group is trying to challenge rajan salvi in front of uday samant in ratnagiri sangameshwar constituency

 

हे देखील वाचा :

Womens Asia Cup 2022 | दीप्ती शर्माच्या फिरकीच्या जोरावर मलेशियावर 74 धावांनी विजय मिळवत भारताची फायनलमध्ये धडक

Amravati ACB Trap | 5 हजार रुपये लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासह हवालदारावर एसीबीकडून FIR

Mumbai ACB Trap | तडीपार कारवाई न करण्यासाठी 2 लाख रुपये लाचेची मागणी, पोलीस निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे रडीचा डाव खेळत आहेत; ‘मशाल चिन्ह मिरवून झाल्यावर …’ नरेश म्हस्के यांचा हल्लाबोल

 

Related Posts