IMPIMP

Mumbai ACB Trap | तडीपार कारवाई न करण्यासाठी 2 लाख रुपये लाचेची मागणी, पोलीस निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
ACB Demand Case | Anti-Corruption News: ACB files case against Assistant Police Inspector Vivek Ashok Pawar in bribery case of 25 thousand

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन तडीपार कारवाई (Tadipaar) न करण्यासाठी दोन लाख रुपये लाच मागून (Demanding Bribe) त्यापैकी 25 हजार रुपये स्विकारुन उर्वरित रकमेची मागणी केल्या प्रकरणी मुंबई लाचलुचपत प्रतबिंधक विभागाने (Mumbai ACB Trap) पोलीस निरीक्षकावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. मानखुर्द पोलीस ठाण्याचे (Mankhurd Police Station) पोलीस निरीक्षक किशोर भानुदास खरात Police Inspector Kishore Bhanudas Kharat (वय-47) असे गुन्हा दाखल झालल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. मुंबई एसीबीच्या युनिटने ((Mumbai ACB Trap) केलेल्या या कारवाईमुळे पोलीस (Mumbai Police) दलात खळबळ उडाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तक्रारदार हा गुन्हेगार असून त्याच्या विरोधात मानखुर्द पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात तडीपार कारवाई न करण्यासाठी किशोर खरात यांनी त्याच्याकडे दोन लाख रुपये लाच मागितली. त्यापैकी 25 हजार रुपये खरात यांनी घेतले. उर्वरित रकमेसाठी खरात यांनी तक्रारदार यांच्याकडे तगादा लावला. मात्र लाच द्यायची नसल्याने तक्रारदार याने मुंबई एसीबीकडे (Mumbai ACB Trap) खरात यांच्या विरोधात तक्रार केली.

 

मुंबई एसीबीच्या अधिकाऱ्यांनी 21 सप्टेंबर रोजी पडताळणी केली असता,
किशोर खरात यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 50 हजार रुपयांची मागणी करुन ती
रक्कम स्वीकारण्याचे कबूल केले.
लाचलुचपत विभागाने किशोर खरात यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Web Title :-  Mumbai ACB Trap | 2 lakh rupees bribe demand for not taking prompt action, police inspector in anti-corruption net

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे रडीचा डाव खेळत आहेत; ‘मशाल चिन्ह मिरवून झाल्यावर …’ नरेश म्हस्के यांचा हल्लाबोल

Thackeray Group | निवडणूक आयोगावर शिवसेनेचे गंभीर आरोप, तुमच्या भूमिकेमुळेच शिंदे गटाला आमची रणनिती समजली

Shanikrupa Heartcare Centre | हृदयविकार असणाऱ्या रुग्णांसाठी खुशखबर! शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये ‘कार्टोग्राफी’ तपासणी केवळ 3 हजारात

 

Related Posts