IMPIMP

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे रडीचा डाव खेळत आहेत; ‘मशाल चिन्ह मिरवून झाल्यावर …’ नरेश म्हस्के यांचा हल्लाबोल

by nagesh
Uddhav Thackeray | balasahebs shivsena naresh mhaske targeted uddhav thackerays

 मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेनेच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून सातत्याने रडीचा डाव खेळला जातो आहे. आमच्यावर अन्याय झाला आहे, असे सारखे बोलून जनतेकडून सहानुभुती मिळवायची हा एकमेव उद्योग उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राहिला आहे, असे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhasake) यांनी म्हंटले आहे. आरडाओरडा खरं तर आम्ही करायला हवा. कारण 80% शिवसेना (Shivsena) आमच्यासोबत असून देखील शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह आमच्या गटाला मिळाले नाही. शिवसेनेचे नाव लावून सतत रडून ते शिवसेनेचा अपमान करत आहेत. त्यांचा विजय झाला की, बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे म्हणायचे आणि पराभव झाला की, निवडणूक आयोग आणि आमच्याकडे बोट दाखवायचे, असे देखील बाळासाहेबांची शिवसेना गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी म्हंटले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून (Thackeray Group) सातत्याने रडीचा डाव खेळाला जातो आहे. गेले तीन महिने सत्तेतून पायउतार झाल्यापासून ते केवळ रडून जनतेची सहानुभुती मिळवत आहेत. आपले कतृत्व काही नाही. केवळ रडायचे पण लोक त्यावर विश्वास ठेवत नाहीत, असे म्हस्के म्हणाले. त्यानी निवडणूक आयोगाला (Election Commission) पत्र लिहिल्यानंतर चिन्ह आणि नाव स्वत: फेसबूक लाईव्ह करत जाहीर केले आणि आता ते निवडणूक आयोगाला दोष देत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) हे नाव तुम्हीच मागितले होते. त्यामुळे ते आयोगाने तुम्हाला दिल्यावर आरोप का करत आहात, अशा प्रश्न म्हस्के यांनी उपस्थित केला आहे.

 

शिवसेनेच्या ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाले. त्यावर त्यांनी आनंद व्यक्त केला. शिवसेनेने मशाल मोर्चे काढले.
दोन दिवस मशाल रॅली काढली.
मशाल हाती घेऊन मातोश्री बंगल्यावर कार्यकर्ते आले आणि आता दोन दिवसांनी त्यांना अन्याय झाल्याचे लक्षात आले आहे.
त्यामुळे केवळ जनतेला फसविण्याचे काम उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) करत असल्याचे नरेश म्हस्के म्हणाले.

 

 

Web Title :- Uddhav Thackeray | balasahebs shivsena naresh mhaske targeted uddhav thackerays

 

हे देखील वाचा :

Thackeray Group | निवडणूक आयोगावर शिवसेनेचे गंभीर आरोप, तुमच्या भूमिकेमुळेच शिंदे गटाला आमची रणनिती समजली

Shanikrupa Heartcare Centre | हृदयविकार असणाऱ्या रुग्णांसाठी खुशखबर! शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये ‘कार्टोग्राफी’ तपासणी केवळ 3 हजारात

Eknath Khadse | विरोधी पक्ष विखुरलेले राहावेत, तसं भाजपचं कारस्थान असू शकतं, एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली शंका

 

Related Posts