IMPIMP

Womens Asia Cup 2022 | दीप्ती शर्माच्या फिरकीच्या जोरावर मलेशियावर 74 धावांनी विजय मिळवत भारताची फायनलमध्ये धडक

by nagesh
 Womes Asia Cup | womens t20 asia cup team india who are strong contenders for the title are all set to win the asia cup for the seventh time

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Womens Asia Cup 2022 | भारतीय महिला क्रिकेट टीमने (Indian Women’s Cricket Team) मलेशियावर (Malaysia) 74 धावांनी विजय मिळवत आशिया कपच्या (Womens Asia Cup 2022) फायनलमध्ये धडक मारली आहे. दिप्ती शर्मा (Dipti Sharma) या सामन्याची नायिका ठरली आहे. तिने या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 7 धावा देऊन 3 विकेट काढल्या. तसेच शेफाली वर्माने (Shafali Verma) 28 चेंडूत 42 धावा ठोकल्या. कॅप्टन हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) 36 धावा करत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय महिलांनी मलेशिया समोर 149 धावांचे लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना मलेशियाच्या संघाची पुरती दमछाक झाली.
मलेशियाच्या संघाला 20 षटकात 9 विकेट्स गमावून फक्त 74 धावा करता आल्या.
या सामन्यात भारताकडून दिप्ती शर्माने 3 विकेट्स, राजेश्वरी गायकवाडने (Rajeshwari Gaikwad) 2 विकेट्स, रेणुका सिंह (Renuka Singh) आणि शेफाली वर्मा यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
(Womens Asia Cup 2022)

 

याअगोदर फलंदाजी करताना टीम इंडियाची खराब सुरुवात झाली. स्मृती मांधना (smriti mandhana)
फक्त 13 धावांवर आऊट झाली. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सने (Jemima Rodrigues) खेळपट्टीवर पाय रोवले.
पण ती वेगाने धावा बनवू शकली नाही. तिने 26 चेंडूत 27 धावा केल्या.
दुसऱ्या बाजूला शेफाली वर्माने आक्रमक फलंदाजी केली.तिने 5 चौकार आणि 1 षटकार ठोकला.
शेफालीने 150 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. हरमनप्रीतने 30 चेंडूत 36 धावा केल्या.
हरमनप्रीत शेवटच्या षटकात वेगाने धावा जमवू शकली नाही त्यामुळे भारताला 20 षटकात फक्त 148 धावा करता आल्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title –  Womens Asia Cup 2022 | india women vs thailand women semi final 1 india women won match by 74 runs against thailand

 

हे देखील वाचा :

Amravati ACB Trap | 5 हजार रुपये लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासह हवालदारावर एसीबीकडून FIR

Mumbai ACB Trap | तडीपार कारवाई न करण्यासाठी 2 लाख रुपये लाचेची मागणी, पोलीस निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे रडीचा डाव खेळत आहेत; ‘मशाल चिन्ह मिरवून झाल्यावर …’ नरेश म्हस्के यांचा हल्लाबोल

 

Related Posts