IMPIMP

Maharashtra Politics | ‘मिंधे गटाने जिंकलेल्या सामन्यात खेळाडू अचानक कुबेर बनले…’; शिवसेनेचे शिंदे-फडणवीस सरकारवर पुन्हा जोरदार टीकास्त्र

by nagesh
Maharashtra Politics | uddhav thackeray group mocks cm eknath shinde devendra fadnavis shivsena

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – Maharashtra Politics | संकटात असलेला राज्यातील शेतकरी (Farmer), अब्दुल सत्तारांसारख्या (Abdul
Sattar) मंत्र्यांची खालच्या दर्जाची वक्तव्य, मोठमोठे प्रकल्प महाराष्ट्राच्या ताटातून उचलून गुजरातला देण्याचे सुरू असलेले काम, यावरून विरोधकांनी
सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. आता शिवसेनेने (Shivsena) राज्यातील या स्थितीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)
आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना खोचक टोला लगावला आहे. ही टीका शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केली
असून मुख्यमंत्री शिंदेंचा उल्लेख ‘मिंधे’ असा केला आहे. (Maharashtra Politics)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, मिंधे गटाने जो सामना तीन महिन्यांपूर्वी जिंकला त्या गटातील खेळाडू अचानक कुबेर बनले. त्या कुबेरांचे लक्ष्मीपूजन काही ठिकाणी झाले. या चाळीस जणांमुळे ‘सामना’ जिंकल्याचा आनंद असा की, एका दिवसात 1900 किलो सोन्याची खरेदी झाली. हे सर्व मिंधे-फडणवीस सरकारमुळेच घडले.

 

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना (India-Pakistan Cricket Match) आपण जिंकू शकलो. विराट कोहलीने (Virat Kohli) एकदम धुवाधार फटकेबाजी केली. पण महाराष्ट्रात मिंधे गटाने तीन महिन्यांपूर्वी ‘सामना’ जिंकून जगात चैतन्य पर्व निर्माण केले नसते तर भारतीय क्रिकेटपटूंच्या ‘बॅटी’ होळीत टाकण्याच्या लायकीच्याही राहिल्या नसत्या. भारताने मेलबर्न जिंकले याचे श्रेय मिंधे व फडणवीस यांनाच द्यावे लागेल. जगात सर्व काही घडते आहे ते त्यांचे सरकार आल्यामुळेच. (Maharashtra Politics)

 

केंद्र आणि राज्य सरकारवर (State Government) खोचक टीका करताना अग्रलेखात पुढे म्हटले आहे की,
ऋषी सुनक (Rishi Sunak) या भारतीय वंशाच्या तरुणाची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली.
हा नवा इतिहास रचला गेला तो कोणामुळे? अर्थात आपले पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) व
महाराष्ट्रातील मिंधे-फडणवीस यांच्या सरकारमुळे. सुनक यांनाच पंतप्रधानपदी नेमून भारतावरील लादलेल्या गुलामीचे प्रायश्चित्त घ्यावे असे एक पत्र महाराष्ट्रातून मिंधे-फडणवीसांना लिहिले गेले.
ते पत्र रातोरात मुंबईतील ब्रिटन उच्चायुक्तांच्या कार्यालयात पोहोचवून त्याच्या अंमलबजावणीच्या जबाबदारीचे
वाटप झाले. आपण ब्रिटनच्या पंतप्रधानपदी बसावे,
यासाठी महाराष्ट्रात पडद्यामागे काय काय हालचाली झाल्या याची त्या सुनक साहेबांना कल्पनाही नसेल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, सध्या राज्यात जे बरे घडते आहे ते फक्त तीन महिन्यांपूर्वी जो सामना मिंधे
गटाने जिंकला त्यामुळेच मुख्यमंत्री एकीकडे 30 लाख शेतकर्‍यांना चार हजार कोटींची मदत दिली असे बुडबुडे सोडत
आहेत तर तिकडे उद्ध्वस्त शेतकरी ‘मदत देता का, मदत?’ असा टाहो सरकारकडे फोडी आहे आणि राज्याचे
कृषीमंत्री जिल्हाधिकार्‍यांना ‘तुम्ही दारू घेता का, दारू?’ असा प्रश्न करीत आहेत. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील
लाखो शेतकर्‍यांच्या घरचे दिवे अजूनही विझलेलेच का आहेत, याचे उत्तर कृषीमंत्र्यांच्या या प्रश्नात दडलेले आहे.

 

 

Web Title :-  Maharashtra Politics | uddhav thackeray group mocks cm eknath shinde devendra fadnavis shivsena

 

हे देखील वाचा :

Pune Minor Girl Rape Case | दत्तवाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नराधम अटकेत

Pune Crime | विवाहित असताना अनेक तरुणींशी संबंध; पुण्यातील पोलिस कर्मचारी बडतर्फ

T20 World Cup 2022 | टीम इंडियाने झिम्बाब्वेला हलक्यात घेऊ नये, ‘या’ दिग्गज खेळाडूने दिला सल्ला

Pune Crime | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण यांच्यावर गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

 

Related Posts