IMPIMP

Pune Crime | विवाहित असताना अनेक तरुणींशी संबंध; पुण्यातील पोलिस कर्मचारी बडतर्फ

by nagesh
Pune Crime | relations with many young women while married; Pune police personnel dismissed

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | विवाहित असतानाही अनेक तरुणींशी संबंध (Physical Relation) ठेवणारा व घटस्फोट झाला
नसतानाही दुसर्‍या महिला पोलीस शिपायाला लग्नाची मागणी घालणार्‍या पोलीस शिपायाला पुणे शहर (Pune Police) पोलीस दलातून बडतर्फ
करण्यात आले आहे. (Pune Crime)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हेमंत नथ्थू रोकडे (Hemant Nathu Rokde) असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. त्याची वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) नेमणूक होती. हेमंत रोकडे याच्याविरुद्ध २ जानेवारी २०२१ रोजी औरंगाबाद ग्रामीण (Aurangabad Rural Police) अंतर्गत कन्नड पोलीस ठाण्यात (Kannad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. रोकडे याचा ६ मे २०१८ रोजी विवाह झाला होता. विवाहानंतरही वेगवेगळ्या मुलींसोबत प्रेमसंबंध (Love Affair) ठेवून व्हॉटसअ‍ॅप चॅटिंग करणे, विवाहित असताना व घटस्फोट झालेला नसताना पोलीस मुख्यालय येथील एका महिला पोलीस अंमलदाराशी प्रेमसंबंध ठेवून तिला लग्नाची मागणी घातली होती. तसेच वेगवेगळ्या मुलींसोबत प्रेमसंबंध ठेवून पत्नीचा विश्वासघात करुन पत्नीला लोणावळा येथे नेऊन संपवून टाकीन अशी धमकी दिली होती.

 

गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली.
त्याला ते केवळ एकदा जबाब नोंदविण्यासाठी हजर राहिले.
त्यानंतर चौकशीला त्यांनी सहकार्य केले नाही.
त्यामुळे एकतर्फी झालेल्या या विभागीय चौकशीत हेमंत रोकडे याने आपल्या कृतीने पोलिसांची प्रतिमा मलीन केली असल्याचे दिसून आल्याने अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale) यांनी त्याला पोलीस सेवेतून बडतर्फ केले आहे.

 

Web Title :-  Pune Crime | relations with many young women while married; Pune police personnel dismissed

 

हे देखील वाचा :

Pune Crime | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण यांच्यावर गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

T20 World Cup 2022 | टीम इंडियाने झिम्बाब्वेला हलक्यात घेऊ नये, ‘या’ दिग्गज खेळाडूने दिला सल्ला

Pune Crime | तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, अश्लिल व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी; पुण्यातील पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत

Aaditya Thackeray | ‘निवडणुकांना समोरे जायला घाबरतात, ते काय गुंतवणूक महाराष्ट्रात आणणार?’ – आदित्य ठाकरे

 

Related Posts