IMPIMP

Maharashtra Rains | महाराष्ट्रात उद्यापासून पाऊस कोसळणार? विकेंडला पावसाचा जोर वाढणार – IMD चा इशारा

by nagesh
Weather Update | temperature rise in vidarbha rainfall possibilities in konkan imd report today

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Rains | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी थंडीची लाट पसरली होती. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यात तापमानात (Temperature) घट देखील झाले होते. त्यामुळे अख्खा महाराष्ट्र गारठला होता. दरम्यान, राज्यातील किमान तापमानात किंचितशी वाढ झाली आहे. आणि पावसासाठी पोषक हवामान निर्माण झालं आहे. राज्यात उद्यापासून अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची (Maharashtra Rains) शक्यता हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी 4 दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. तसेच काही जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट (Yellow alert) दिला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

उद्या (गुरूवारी) धुळे आणि नंदुरबार (Dhule and Nandurbar) या 2 जिल्ह्यात ढगाळ हवामानाची स्थिती राहणार आहे. त्यामुळे आगामी 24 तासाच या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर, 7 जानेवारीनंतर राज्यात हळुहळू पावसाचा (Maharashtra Rains)जोर वाढणार आहे. शुक्रवारी नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच 8 आणि 9 जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवला आहे.

 

 

दरम्यान, 8 जानेवारी रोजी हवामान खात्याने बुलडाणा, वर्धा, अकोला, नागपूर आणि अमरावती या 5 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला गेला आहे. तसेच, ठाणे, पालघरसह उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. रविवारी हवामान खात्याने वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या 9 जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे. या जिल्ह्यात विकेंडला विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Maharashtra Rains | heavy-rainfall possibilities in maharashtra from tomorrow imd give yellow alert Dhule and Nandurbar

 

हे देखील वाचा :

Rupali Chakankar | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनाही कोरोनाचा संसर्ग

Universities-Colleges Maharashtra | राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार; उदय सामंत यांची माहिती

Pune Crime | गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून चंदन तस्करी प्रकरणी एकला अटक, 102 किलो चंदनाचे लाकडाचे ओंडके जप्त

 

Related Posts