IMPIMP

Maharashtra Rains | राज्यात पुन्हा विजा कडाडणार, नववर्षाआधी राज्यात ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता

by nagesh
Maharashtra Rain Update | heavy rainfall likely to continue for next three hrs over mumbai thane and parts of raigad and palghar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन नवीन वर्ष (New year) सुरु होण्याआधी राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची (Maharashtra Rains) शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या राज्यात विदर्भ (Vidarbha), मराठवाड्यात (Marathwada) कडाक्याची थंडी (Extreme cold) पडली आहे. नागपूर (Nagpur) आणि गडचिरोलीत (Gadchiroli) कमाल तापमानात (temperature) घसरण झाली आहे. अशातच आता हवामान विभागानं (IMD) डिसेंबर अखेर पाऊस (Maharashtra Rains) बरसणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

सध्या महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. अशातच 28 डिसेंबर रोजी औरंगाबाद, जालना, जळगाव, गोंधीया, भंडारा, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह (Thunderstorm) हलका ते मध्यम पाऊस (Maharashtra Rains) पडू शकतो. तर 27 डिसेंबर रोजी विदर्भात तुरळक प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान विभागाचे तज्ज्ञ के.एस. होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

 

 

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील तापमान

मागील काही दिवसांपासून राज्यातील काही शहरांचे तापमान घसरले आहे. आज राज्यातील नांदेड 13.8, जालना 13.3, सोलापूर 13, परभणी 13.5, कुलाबा 20, सांताक्रूझ 18.4, पुणे 12.4, कोल्हापूर 16.6, रत्नागिरी 17.1, बारामती 13.3, नाशिक 12, सांगली 15.2, माथेरान 16.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

देशात थंडी वाढली
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडील भागात बर्फवृष्टीमुळे लेह-लडाख (Leh-Ladakh) यासारख्या जागांवर पारा उणे अंशांवर पोहोचला आहे. तसेच दिल्ली, राजस्थान, पंजाब, ओडिशा या राज्यांतही थंडी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये येत्या काही दिवसांत वाढत्या थंडीपासून दिलासा मिळू शकतो.

 

हवामान खात्याने म्हटले की, 5 जानेवारी 2022 पर्यंत भारतातील बहुतांश भागात थंडीची लाट राहणार नाही.
पण आज (दि.24) देशाच्या विविध भागात थंडीचा लाट होऊ शकतो.
हवामान विभागाने आपल्या एका अंदाजात म्हटले की,
27 ते 30 दरम्यान सक्रिय पश्चिमी विक्षोभामुळे बिहारच्या अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- Maharashtra Rains | maharashtra weather forecast rainfall in winter in these districts of maharashtra

 

हे देखील वाचा :

Pune Metro-Sambhaji Bridge Traffic | पुण्यातील संभाजी पुलावरील (लकडी पुल) वाहतूक ‘या’ वेळेत बंद राहणार

Pune Crime | पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागणाऱ्या आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Aadhaar Card | आधार कार्ड गहाळ झाल्यास ‘या’ क्रमांकावरुन मिळवा नवीन आधार; जाणून घ्या महत्वाची प्रक्रिया

 

Related Posts