IMPIMP

Maharashtra Rains | मुंबईकरांनो काळजी घ्या ! आगामी 5 दिवस कोकणात मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईला यलो ‘Alert’ – IMD

by nagesh
Rain in Maharashtra | yellow alert for rain in the entire maharashtra weather update

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Rains | राज्यातील काही जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी (Maharashtra Rains) लावली आहे. तर काही ठिकाणी पावसाची रिपरिप दिसून येत आहे. दरम्यान मुंबईत (Mumbai) मागील दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. आगामी पाच दिवस मुंबईत हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department-IMD) यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. तसेच, पालघर, मुंबई, ठाणे, कोल्हापूरपर्यंत आगामी 3 दिवस मुसळधार पाऊस (Rains) कोसळणार असल्याचा इशारा दिला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पश्चिम महाराष्ट्रापासून (Western Maharashtra) ते विदर्भापर्यंत (Vidarbha) चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईतील नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडा, याबाबत आदेश देण्यात आले आहेत. मागील 2 दिवसांपासून मुंबईमध्ये पाऊस कोसळत आहे. काल पहिल्या दिवशी मुंबईतील नेहमीच्या ठिकाणी पाणी साचले होते. हिंदमाता चौक, अंधेरी, गांधी मार्केट आदी भागात पाणी साचले होते. रात्री उशिरा या पाण्याचा निचरा झाला आहे. (Maharashtra Rains)

 

दरम्यान, कोकण वगळता उर्वरित भागात येत्या 4 दिवसांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आले आहे.
त्याचबरोबर राज्यात गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोकणात मुसळधार पाऊस झाला आहे.
आज देखील पावसाची रिपरिप दिसून आली असून मुंबईत मात्र धुवाधार पाऊस कोसळत असल्याचं दिसतंय.

 

आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत बैठक –
पावसाचे प्रमाण अधिक झाल्यास मुंबईत पाणी तुंबण्याची शक्यता असल्याने या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde),
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत (Disaster Management Department) बैठक होत आहे.
यामध्ये अधिकाऱ्यांना खबरदारीचे आदेश देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Maharashtra Rains | rain alert yellow alert for next five days in mumbai a heavy rain will hit konkan kolhapur region

 

हे देखील वाचा :

Rashami Desai Gorgeous Look | रश्मि देसाईने ओलांडल्या बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा, व्हायरल फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का..!

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर मोठा हल्ला, म्हणाले – ‘सत्तेसाठी रातोरात झाला खेळ, हा…’

Chandrakant Patil | ‘या’ कारणामुळं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले’; चंद्रकांत पाटलांनी केला खुलासा

 

Related Posts