IMPIMP

Maharashtra Shasan Aplya Dari Scheme 2023 | ‘शासन आपल्या दारी ‘ उपक्रमाअंतर्गत 317 नागरिकांना लाभ

by nagesh
Maharashtra Shasan Application Date Scheme 2023 | 317 citizens benefited under ‘Shasan Aaya Dari’ initiative

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Shasan Aplya Dari Scheme 2023 | जिल्हाधिकारी कार्यालय (Pune Collector Office) आणि पुणे तहसील कार्यालयातर्फे (Pune Tahsil Office) पर्वती विधानसभा मतदारसंघातील (Parvati Assembly Constituency) दत्तवाडी (Dattawadi) येथे ‘शासन आपल्या दारी ‘ उपक्रमाअंतर्गत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal) यांच्या हस्ते विविध योजना आणि सेवांच्या लाभाचे वितरण करण्यात आले. मेळाव्यात ३१७ नागरिकांना विविध योजना व सेवांचा लाभ देण्यात आला. (Maharashtra Shasan Aplya Dari Scheme 2023)

तहसीलदार राधिका हावळ-बारटक्के यांच्या उपस्थितीत मेळाव्यात सर्व प्रकारचे शासकीय दाखले व योजनांची माहिती नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली. विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी नोंदणी, दाखले तयार करून वाटप करणे, योजनांची माहिती देणे यासोबतच योजनांचा प्रत्यक्षात लाभही नागरिकांना देण्यात आला. विविध प्रकारचे ऑनलाईन अर्ज भराण्याची सुविधादेखील करण्यात आली होती. (Maharashtra Shasan Aplya Dari Scheme 2023)

विविध शासकीय विभागांच्या कक्षाद्वारे नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
मतदार नोंदणी आणि आधार कार्ड अद्ययावत करण्याची सुविधादेखील यावेळी उपलब्ध करून देण्यात आली होती.

शासनाने नागरिकांच्या सुविधेसाठी हा चांगला उपक्रम सुरू केला असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा,
असे आवाहन आमदार श्रीमती मिसाळ यांनी यावेळी केले.

Web Title : Maharashtra Shasan Application Date Scheme 2023 | 317 citizens benefited under ‘Shasan Aaya Dari’ initiative

Related Posts