IMPIMP

ACB Trap On Sunita Dhangar | नाशिक महानगरपालिकेतील शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांच्या बँक खात्यात देखील मोठं ‘घबाड’

by nagesh
ACB Trap On Sunita Dhangar | The bank account of Sunita Dhangar, education officer in Nashik Municipal Corporation, is also in trouble

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन – ACB Trap On Sunita Dhangar | नाशिकच्या अ‍ॅन्टी करप्शन विभागाने (Nashik ACB Trap) 55 हजाराची लाच घेतल्यानंतर (Nashik Bribe Case) महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी सुनिता सुभाष धनगर (Sunita Subhas Dhangar) यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या घरझडतीमध्ये 85 लाख रूपयांची रोकड आणि 322 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दगिने मिळुन आले होते. आता सुनिता धनगर यांच्या बँक खात्याची झाडाझडती सुरू असता त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये तब्बल 30 लाख 16 हजार 620 रूपये जमा असल्याचं समोर आलं आहे. (ACB Trap On Sunita Dhangar)

लाच घेतल्याप्रकरणी सुनिता धनगर यांच्याविरूध्द (Sunita Dhangar Arrested) नाशिक पोलिस (Nashik Police) दलातील सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये (Sarkarwada Police Station) गुन्हा दाखल आहे. त्यांच्या घरझडतीत यापुर्वीच मोठं घबाड मिळुन आलं आहे. आता अ‍ॅन्टी करप्शनच्या पोलिसांनी सुनिता धनगर यांच्या बँक अकाऊंटची (Sunita Dhangar Bank Account) तपासणी केली असता त्यामध्ये देखील 30 लाख 16 हजार 620 रूपये मिळून आले आहेत. स्टेस्ट बँक ऑफ इंडियामधील State Bank Of India (SBI Nashik) चार वेगवेगळ्या खात्यावर आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Nashik District Central Co Operative Bank Ltd) खात्यावर ही रक्कम जमा असल्याचे अ‍ॅन्टी करप्शनच्या तपासात समोर आले आहे. पोलिस निरीक्षक संदीप घुगे (PI Sandeep Ghuge) हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दरम्यान, आज (दि. 5 जून 2023) रोजी सुनिता धनगर यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

न्यायालयाने त्यांच्या पोलिस कोठडीत 1 दिवसाची वाढ केली आहे.
नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
पोलिस उप अधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप घुगे प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Web Title : ACB Trap On Sunita Dhangar | The bank account of Sunita Dhangar, education officer in
Nashik Municipal Corporation, is also in trouble

Related Posts