IMPIMP

MahaTET Exam Scam Case | पुणे पोलिसांची उत्तर प्रदेशात मोठी कारवाई, GA Software कंपनीचा सौरभ त्रिपाठी ताब्यात

by nagesh
Pune Police | Woman safely home after 12 years from abroad, commendable performance of Pune Police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन MahaTET Exam Scam Case | शिक्षक पात्रता परीक्षा (TET) गैरव्यवहार प्रकरणी राज्यात मोठी खळबळ उडाली. या घोटाळा प्रकरणी (MahaTET Exam Scam Case) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त (Commissioner of Maharashtra State Council of Examination) तुकाराम सुपे (Tukaram Supe) आणि त्यांनतर महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी विभागीय अध्यक्ष सुखदेव डेरे (Sukhdev Dere) तसेच जीए टेक्नॉलॉजीचे प्रमुख अश्विन कुमार (Ashwin Kumar) यांनाही पुणे पोलिसांनी अटक केली. यानंतर आता जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा माजी संचालक सौरभ त्रिपाठीला (Saurabh Tripathi) अटक करण्यात आले आहे. ही कारवाई पुणे पोलिसांनी (Pune Police) केली.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2018 मध्ये झालेल्या घोटाळ्या प्रकरणी (MahaTET Exam Scam Case) पोलिसाकडून सौरभ त्रिपाठी याला ताब्यात घेण्यात आलं. त्रिपाठी याला उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथून ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, सौरभ त्रिपाठी हा जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा माजी संचालक आहे. त्याने 2018 सालच्या टीईटी परीक्षेच्या निकालात गैरव्यवहार केल्याचा ठपका त्याच्यावर आहे. याप्रकरणी लखनऊ येथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. अपात्र असलेल्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र दाखवण्याचं काम त्रिपाठी हा करत असल्याचा आरोप आहे.

दरम्यान, सौरभ त्रिपाठी (Saurabh Tripathi) सध्या ‘विनर’ कंपनीमध्ये कार्यरत आहे.
सध्या शिक्षण विभागाच्या परीक्षांचे कामकाज विनर कंपनीकडे आहे.
यामुळे विनरच्या उत्तर प्रदेशातील परीक्षा देखील वादग्रस्त ठरणार का? असा सवाल देखील उपस्थित होतो आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- MahaTET Exam Scam Case | tet exam 2018 scam saurabh tripathi of ga software technologies pvt ltd detained by pune police from lucknow uttar pradesh

 

हे देखील वाचा :

आता जुने चॅट आणि कॉन्टॅक्ट न गमावता कसा बदलायचा WhatsApp नंबर? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Pune Crime | 24 वर्षीय तरूणीची 4 मजली इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या, पुण्याच्या वाकड परिसरातील घटना

Varsha Gaikwad | शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं मोठं विधान; म्हणाल्या – ‘…तर शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेऊ’

 

Related Posts