IMPIMP

Manipur Landslide | मणिपूरमध्ये दरड कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू; लष्करी जवानांचा समावेश, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले

by nagesh
Manipur Landslide | manipur landslide 14 dead many feared trapped as rescue ops continue

मणिपूर : वृत्तसंस्था Manipur Landslide | मणिपूरमध्ये दरड कोसळल्याने (Manipur Landslide) 14 जणांचा मृत्यू (Died) झाला आहे. त्यामध्ये सात जवानांचा देखील समावेश आहे. दरम्यान त्या घटनेमध्ये अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. यामध्ये जवानांचाही समावेश आहे. घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने (Landslide) मदतकार्य करण्यास अडथळे येत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

TA च्या 107 तुकड्यांना 29 जूनच्या रात्री नोनी जिल्ह्यातील तुपल रेल्वे स्टेशनजवळ जोरदार भूस्खलनाचा फटका बसला. बांधकामाधीन मणिपूर-जिरिबाम रेल्वे मार्गाचे रक्षण करण्यासाठी या ठिकाणी तैनात असलेले सैनिक उपस्थित होते. भूस्खलनाच्या घटनेनंतर भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सने बचाव कार्य (Rescue Operation) सुरू केले. अशी माहिती भारतीय लष्कराने (Indian Army) दिली आहे. (Manipur Landslide)

 

इम्फाळ-जिरिबाम रेल्वे मार्गाच्या (Imphal-Jiribam Railway Line) सुरक्षेसाठी भारतीय लष्कराची एक तुकडी तैनात करण्यात आली होती. याच ठिकाणी भूस्खलन झाले आहे. ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या जवानांना आणि नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. या दरम्यान, मदत आणि बचाव कार्य चालू असलेल्या यंत्रसामग्रीचा उपयोग रेल्वेच्या साइट इंजिनीअरिंग प्लांटमधून मदत आणि बचाव कार्यासाठी करण्यात आला. तर, पहाटे साडेपाच वाजेपर्यंत 13 जवानांना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. सर्व जखमींवर आर्मी मेडिकल युनिट येथे उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी जवानांना इम्फाळ आणि इतर ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती आहे.

 

Web Title :- Manipur Landslide | manipur landslide 14 dead many feared trapped as rescue ops continue

 

हे देखील वाचा :

LPG Gas Cylinder Price | दिलासादायक ! LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात; जाणून घ्या प्रमुख शहरातील दर

Eknath Shinde CM | ‘मी एकनाथ संभाजी शिंदे…’ एकनाश शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; देवेंद्र फडणवीस पुन्हा आले पण उपमुख्यमंत्री बनून

Gold-Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

 

Related Posts