IMPIMP

Mayor Muralidhar Mohol | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा पुन्हा बंद, पुण्यातील शाळांबाबत महापौरांनी सांगितलं…

by nagesh
mayor-muralidhar-mohol-schools-in-pune-will-not-be-closed-immediately-clear-from-mayor-muralidhar-mohol-after-corona-review-meeting-today

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनकोरोनासोबत (Corona) ओमिक्रॉनच्या (Omicron) वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने (BMC) घेतला आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Municipal Commissioner Iqbal Singh Chahal) यांनी हा निर्णय जाहीर केले. यानंतर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांना पुण्यातील शांळांबाबत (School in Pune) विचारण्यात आले. त्यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी पुण्यात तूर्तास तरी शाळा बंदचा (School Closed) निर्णय नसल्याचे स्पष्ट केलं. तसेच पालकमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर नव्या निर्बंधांबाबत निर्णय होईल, असंही महापौर म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना मुंबई (Mumbai), पुणे, नाशिक (Nashik), नागपूर (Nagpur) या महत्त्वाच्या शहरांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. काल पुण्यात 524 नवे रुग्ण आढळून आले होते. तर 36 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज महापौर मुरलीधर मोहोळ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर कोरोनास्थिती आणि आरोग्य व्यवस्थेबाबत त्यांनी माहिती दिली.

महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी सांगितले की, मागील आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. 27 डिसेंबरपासून ते कालपर्यंत सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या अडीच हजारांपर्यंत पोहोचली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढतत असली तरी रुग्णांमध्ये तीव्र लक्षणं नाहीत. ओमिक्रॉनचे 36 रुग्ण आहेत. यात दोन डोस घेतलेले 70 ते 75 टक्के लोक आहेत. त्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. सध्या 80 रुग्ण ऑक्सिजनवर असल्याची माहिती महापौरांनी दिली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शाळेचा निर्णय पालकमंत्र्यांच्या बैठकीत

महापौर म्हणाले, लसीकरणामध्ये (Vaccination) पुणे राज्यात सर्वात पुढे आहे. 10 जानेवारीपासून बुस्टर डोस (Booster Dose) सुरु करत आहोत. तसेच नवीन निर्बंधांसंदर्भात पालकमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. यात शाळा, उद्यानं (Garden) आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत (Public Transport System) विचार केला जाईल, असं महापौरांनी स्पष्ट केलं.

 

हे देखील वाचा :

Uric Acid Cause And Problem | यूरिक अ‍ॅसिड वाढल्याने शरीरात कोणत्या अडचणी निर्माण होतात? ते कसे कमी करावे, जाणून घ्या

Small Savings Schemes | मोदी सरकारचा निर्णय ! अल्प बचत योजनांवरील व्याजदर कायम राहणार; जाणून घ्या

Boiled Egg Benefits | जर यावेळी खाल्ले रोज 1 उकडलेले अंडे तर दूर पळून जातील अनेक आजार, होतील जबरदस्त फायदे

 

Related Posts