IMPIMP

MCA Election | एमसीए निवडणुकीत पवार-शेलार पॅनलने मारली बाजी, अमोल काळे MCA चे नवे अध्यक्ष

by nagesh
MCA Election | mca election amol kale captain of mumbai cricket sandeep patil lost aditya uddhav thackeray absent

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत (MCA Election) पवार-शेलार पॅनलने (Pawar-Shelar Panel) दणदणीत विजय मिळवला आहे. एमसीए अध्यक्षपदी अमोल काळे (Amol Kale) यांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत (MCA Election) अमोल काळे यांना 183 तर संदीप पाटील (Sandip Patil) यांना 150 मतं मिळाली. या निवडणुकीत सचिवपदी मयंक खांडवाला (Mayank Khandwala), खजिनदारपदासाठी अरमान मलिक (Armaan Malik) गव्हर्निंग काऊन्सिलपदी गणेश अय्यर (Ganesh Iyer) यांचा विजय झाला आहे. हे सगळे पवार-शेलार पॅनलकडून उभे राहिले होते. याशिवाय अ‍ॅपेक्स काऊन्सिलमध्ये (Apex Council) मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचाही विजय झाला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अ‍ॅपेक्स काऊन्सिल कमिटीमध्ये मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी 221 सर्वाधिक मते मिळवली. त्याचप्रमाणे नीलेश भोसले Nilesh Bhosale (219), कौशिक गोडबोले Kaushik Godbole (205), अभय हडप Abhay Hadap (205), सूरज समत Suraj Samat (170), जितेंद्र आव्हाड Jitendra Awad (163), मंगेश साटम Mangesh Satam (157), संदीप  विचारे Sandeep Vikhare (154) आणि प्रमोद यादव Pramod Yadav (152) यांनीही बाजी मारली. यामध्ये कौशिक गोडबोले, संदीप  विचारे आणि अभय हडप हे संदीप पाटील यांच्या मुंबई क्रिकेट ग्रुपचे (Mumbai Cricket Group) उमेदवार आहेत तर बाकी सगळेजण पवार-शेलार पॅनलचे उमेदवार आहेत.

 

 

 

 

ठाकरेंची अनुपस्थिती

 

एमसीएच्या अ‍ॅपेक्स काऊन्सिलच्या 9 जागांसाठी 23 जण रिंगणात होते, यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
(Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचाही समावेश होता.
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात.
ठाकरेंची सावली म्हणूनही मिलिंद नार्वेकर यांची ओळख आहे.
एमसीएच्या या निवडणुकीत (MCA Election) मिलिंद नार्वेकर रिंगणात होते,
पण तरीही ठाकरे मतदानाला आले नाहीत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि तेजस ठाकरे
(Tejas Thackeray) हे एमसीएचे सदस्य आहेत, पण तिघांनीही निवडणुकीकडे पाठ फिरवली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पाटील ठरले चौथे क्रिकेटपटू

 

एमसीए अध्यक्षपदाच्या लढतीत पराभूत होणारे संदीप पाटील चौथे क्रिकेटपटू ठरले. याअगोदर माधव मंत्री
(1991, मनोहर जोशी विरुद्ध), अजित वाडेकर (2001, शरद पवार यांच्याविरुद्ध) आणि दिलीप वेंगसरकर (2011, विलासराव देशमुख यांच्याविरुद्ध) यांचाही अध्यक्षपदाच्या लढतीत पराभव झाला होता.

 

 

Web Title :-  MCA Election | mca election amol kale captain of mumbai cricket sandeep patil lost aditya uddhav thackeray absent

 

हे देखील वाचा :

Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळे यांना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करावेत, त्यांना सातत्याने झटके येत आहेत – रुपाली ठोंबरे पाटील

Pune Crime | भरती प्रक्रियेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी उपसंचालकासह तिघांवर FIR; अल्पवयीन मुलाला दिली नियुक्ती

MNS Mission Baramati | भाजपा पाठोपाठ मनसेचेही ‘मिशन बारामती’; पुण्यात राज ठाकरेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश

 

Related Posts