IMPIMP

Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळे यांना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करावेत, त्यांना सातत्याने झटके येत आहेत – रुपाली ठोंबरे पाटील

by nagesh
 Chandrashekhar Bawankule | bjp state president chandrashekhar bawankule criticized by rupali patil thombare over his comment on ncp election symbol

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आम्ही शिवसेनेच्या ठाकरे गटाची (Shiv Sena Thackeray Group) मशाल विझवणार आणि राष्ट्रवादीचे (NCP) घड्याळ बंद पाडणार, असे म्हंटले होते. त्यावर आता राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करावेत, असे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) म्हणाल्या.

 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) भाऊ यांना कोणीतरी तातडीने रुग्णालयात घेऊन जावे. सातत्याने त्यांना झटके येत आहेत. घड्याळ बंद पाडू, महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) उमेदवार मिळणार नाही, यासारखी विधाने म्हणजे झटक्याचे लक्षण आहे. त्यांच्यावर त्वरीत उपचार करणे गरजेचे आहे. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष या नात्याने सरकारसमोरील प्रश्नावर भाष्य केले पाहिजे, असे ठोंबरे पाटील म्हणाल्या. महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. शेतकऱ्यांना लवकर मदत मिळाली पाहिजे आणि त्यांना दिवाळीसाठी अन्न धान्याचे कीट देखील मिळाले पाहिजे, अशी मागणी देखील पाटील यांनी यावेळी शासनाकडे केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मागील अनेक दिवस बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) विरोधात आपला मोर्चा उघडला आहे.
ते सातत्याने महाविकास आघाडीतील पक्षांवर आणि नेत्यांवर टीकेची झोड उठवत आहेत.
शिवसेनेची (Shivsena) मशाल विझवणे आणि राष्ट्रवादीचे (NCP) घड्याळ बंद पाडणे हे आमचे लक्ष आहे,
असे बावनकुळे अनेक ठिकाणी म्हणाले आहेत. बारामतीत घड्याळ बंद पाडले पाहिजे.
काँग्रेसचा (Congress) पंजा साकुलीत थांबला पाहिजे. आणि उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) हाती घेतलेली मशाल अरबी समुद्राच्या पाण्याने विझवली पाहिजे.
त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून त्यांचा चांगला समाचार घेतला गेला आहे.

 

Web Title :- Chandrashekhar Bawankule | bjp state president chandrashekhar bawankule criticized by rupali patil thombare over his comment on ncp election symbol

 

हे देखील वाचा :

Pune Crime | भरती प्रक्रियेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी उपसंचालकासह तिघांवर FIR; अल्पवयीन मुलाला दिली नियुक्ती

MNS Mission Baramati | भाजपा पाठोपाठ मनसेचेही ‘मिशन बारामती’; पुण्यात राज ठाकरेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश

Pune CP Amitabh Gupta On Traffic | पुणे शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांचे मोठे पाऊल

 

Related Posts