IMPIMP

MNS Mission Baramati | भाजपा पाठोपाठ मनसेचेही ‘मिशन बारामती’; पुण्यात राज ठाकरेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश

by nagesh
MNS Mission Baramati | ncp workers join mns party presence of raj thackeray vasant more baramati pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  MNS Mission Baramati | बारामतीचा गड जिंकणे तितके सोपे नसल्याने भाजपसारख्या (BJP) राष्ट्रीय पक्षाने त्यासाठी आतापासूनच नियोजनपूर्वक तयारी सुरू केली आहे. लोकसभेला येथील उमेदवार विजयी करण्याची जबाबदारी पक्षाने थेट देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्यावर सोपवली आहे. नुकताच सितारमन यांनी बारामतीचा दौरा करून लोकसभेला बारामती जिंकणार, असा विश्वास व्यक्त केलाय. आता भाजपा पाठोपाठ मनसेसारख्या प्रादेशिक पक्षाने सुद्धा बारामतीकडे (MNS Mission Baramati) विशेष लक्ष दिले असल्याचे दिसत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काल पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमात बारामतीमधील राष्ट्रवादीच्या (NCP) काही कार्यकर्त्यांनी मनसे पक्षात प्रवेश केल्याचे मनसेचे स्थानिक नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी सांगितले. यावरून मनसेने देखील मिशन बारामती (MNS Mission Baramati) सुरू केले असल्याचे दिसून येत आहे.

 

मनसेत प्रवेश केलेले हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शहराशी संलग्न भागातील असून त्यांच्या पक्षप्रवेशामुळे मनसेला आगामी महापालिका निवडणुकीत (Municipal Elections) फायदा होईल, असा दावा मनसे पदाधिकार्‍यांनी केला. मनने अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या पुढाकारातून हा पक्षप्रवेश घडवून आणण्यात आला होता.

 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मावळ (Maval), बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी (Shirur Lok Sabha constituencies) निरीक्षकांची नियुक्ती काही दिवसांपूर्वी केली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी वसंत मोरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
त्यानुसार बारामती लोकसभा मतदारसंघात असलेल्या शहरी भागाशी संलग्न भागावर लक्ष केंद्रित करण्यात आले
आहे. त्यानुसार खडकवासला (Khadakwasla), वारजे (Warje), नर्‍हे-आंबेगाव (Narhe-Ambegaon)
भागातील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

छावा संघटनेचे (Chava Sanghatana) आप्पा आखाडे (Appa Akhade), नर्‍हे-आंबेगाव परिसरातील समीर कुटे
(Sameer Kute), भोर तालुक्यातील केळवडे गावातील रोहित वाल्हेकर (Rohit Walhekar),
वारजे परिसरातील संदीप तांगुदे (Sandeep Tangude) यांनी मनसेत प्रवेश केला.
हे सर्व कार्यकर्ते ताकदीचे असून त्यांचा बारामती लोकसभा निवडणुकीसह आगामी महापालिका निवडणुकीत मनसेला
फायदा होईल, असा दावा वसंत मोरे यांनी केला.

 

तसेच, मनसे सरचिटणीस हेमंत संभूस (MNS General Secretary Hemant Sambhus) यांची
महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेच्या राज्य अध्यक्षपदी आणि संतोष दसवडकर (Santosh Daswadkar) यांची भोर-वेल्हा-मुळशी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

Web Title :-  MNS Mission Baramati | ncp workers join mns party presence of raj thackeray vasant more baramati pune

 

हे देखील वाचा :

Pune CP Amitabh Gupta On Traffic | पुणे शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांचे मोठे पाऊल

Pune Crime | ऑमलेट नीट बनवता येत नाही म्हणून पुण्यातील पोलिस हवालदाराने दाबला गळा; खूनाचा प्रयत्न

TV Actress Vaishali Thakkar Suicide Case | वैशाली ठक्कर आत्महत्या प्रकरणात राहुल नवलानीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

 

 

Related Posts