IMPIMP

Meenakshi Shinde | दुर्जनांचा नाश करण्यासाठी तलवार आणि सज्जनांच्या रक्षणार्थ आम्हाला ढाल मिळाली, ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

by nagesh
Meenakshi Shinde | We got a sword to destroy the bad guys and a shield to protect the gentlemen, former Thane mayor Meenakshi Shinde attacked the Thackeray group.

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाइन केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) शिवसेनेच्या अंतर्गत वादावर तोडगा काढला. अंधेरी पूर्व येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी (Andheri East by-Election) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाला हंगामी नावे आणि चिन्हे देण्यात आली आहेत. त्यात ठाकरे यांच्या गटाला ‘मशाल’ हे बोधचिन्ह मिळाले, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्ह मिळाले आहे. या चिन्हाचा दोन्ही गटांनी स्वीकार करत जल्लोष साजरा केला. ठाण्याच्या माजी महापौर (Thane Former Mayor ) मिनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. दुर्जनांचा नाश करण्यासाठी तलवार आणि सज्जानांच्या रक्षणार्थ आम्हाला ढाल मिळाली आहे, असे मिनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) म्हणाल्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवसेना 1966 साली मुंबईत जरी स्थापन झाली असली, तरी ठाण्यातून प्रथम लोकप्रतिनिधी आनंद दिघे (Anand Dighe) यांनी शिवसेनेला निवडून दिले. त्यावेळी शिवसेनेची निशाणी ढाल तलवारच होती. त्यामुळे आता योगायोगाने त्यांचे शिष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना देखील तीच निशाणी मिळाली आहे. आता आम्ही ठाण्यातील महिला आघाडी त्यांच्या पाठिशी उभे राहणार आहोत, असे मिनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) म्हणाल्या.

 

आमच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena of Balasaheb) नाव मिळाले आहे.
त्यामुळे आम्ही बाळासाहेबांची शिवसेना म्हणून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलो आहोत.
आम्हाला जी ढाल तलवार मिळाली आहे, ती शिवाजी महाराजांची आहे.
देशावर ज्यावेळी परकीय आक्रमणे होत होती, त्यावेळी शिवाजी महाराजांनी याच ढाल तलवारीच्या सहाय्याने विजय मिळविला.
तसेच शिवसेना मागील काळात हिंदुत्वापासून परावृत्त झाली होती.
तेव्हा आता आगामी काळात आम्ही याच ढाल तलवारीच्या माध्यमाने हिंदुत्वाचा विजय नक्की करु.
ढाल तलवारीने आम्ही हिंदुत्वावरील अन्याय दूर करणार आहोत, असे माजी महापौर नरेश म्हस्के
(Former Mayor Naresh Mhaske) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Meenakshi Shinde | We got a sword to destroy the bad guys and a shield to protect the gentlemen, former Thane mayor Meenakshi Shinde attacked the Thackeray group.

 

हे देखील वाचा :

Pune Shivsena | पुण्यातील मशालयात्रेत शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये राडा! फ्री-स्टाईल हाणामारीचा Video व्हायरल

Aditya Thackeray | चिन्हाबाबत आदित्य ठाकरेंचे स्पष्ट मत, म्हणाले – हा प्रश्न शिवसेना, धनुष्यबाण, ठाकरे परिवार…

Pune Crime | हॉर्न वाजविल्याने तरुणाच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार, कसबा पेठेतील घटना

 

Related Posts