IMPIMP

Pune Shivsena | पुण्यातील मशालयात्रेत शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये राडा! फ्री-स्टाईल हाणामारीचा Video व्हायरल

by nagesh
Pune Shivsena | fighting in mashal yatra of uddhav thackeray group in manchar video viral

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन   Pune Shivsena | मुळ शिवसेनेला निवडणूक आयोगाने (Election Commission) पोटनिवडणुकीसाठी शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena-Uddhav Balasaheb Thackeray) हे नाव आणि धगधगती मशाल हे पक्षचिन्ह दिल्यानंतर पुणे जिल्ह्यातील मंचर येथे शिवसेनेने (Pune Shivsena)आपले चिन्ह जनतेसमोर पोहचवण्यासाठी मशाल (Mashal Symbol) यात्रा काढली होती. या यात्रेत दोन नेत्यांमध्ये आपसात हाणामारी झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवसेनेने (Pune Shivsena) आपले चिन्ह जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी मशाल यात्रा (Mashal Yatra) काढण्याचे नियोजन केले आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात काल दुपारी मशाल क्रांतीज्योतीचे स्वागत करण्यात आले. मात्र, या यात्रेत शिवसेनेच्या दोन नेत्यांची फ्री-स्टाईल हाणामारी झाल्याचा विचित्र प्रकार घडला.

 

किल्ले शिवनेरी (Shivneri Fort) ते मातोश्री (Matoshree) मशाल क्रांतीज्योतीचे आयोजन करण्यात आले होते. मंचर येथे मशाल यात्रेचे आगमन झाले यावेळी ज्योत हातात घेण्यासाठी मंचरचे माजी सरपंच दत्ता गंजाळे (Former Sarpanch Dutta Ganjale) उपस्थित झाले. मात्र, शिवसेनेचे जिल्हा संघटक तथा माजी पंचायत समिती सदस्य राजा बाणखेले (Raja Bankhele) यांनी गंजाळे यांना रोखले आणि यावरुन दोन नेत्यांमध्ये हाणामारी झाली.

 

मशाल घेण्यासाठी गंजाळे आले असता बाणखेले म्हणाले की, शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपच्या (BJP) व्यासपीठावर असणार्‍यांचे इथे काय काम?
येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shivsena Chief Balasaheb Thackeray),
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निष्ठा असलेल्यांनाच मशालीचे स्वागत करण्याचा अधिकार आहे.
यावर गंजाळ यांनी आपण कधीही शिंदे गटात आणि भाजपच्या व्यासपीठावर गेलो नाही, असे म्हटले.
यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये फ्री-स्टाइल हाणामारी झाली.
तालुका प्रमुख दिलीप पवळे आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी दोघांना रोखले आणि हा वाद मिटवला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Shivsena | fighting in mashal yatra of uddhav thackeray group in manchar video viral

 

हे देखील वाचा :

Aditya Thackeray | चिन्हाबाबत आदित्य ठाकरेंचे स्पष्ट मत, म्हणाले – हा प्रश्न शिवसेना, धनुष्यबाण, ठाकरे परिवार…

Pune Crime | उधार सिगारेट न दिल्याने मुलावर कोयत्याने सपासप वार, 4 जणांवर FIR

Samata Party | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या निशाणी ‘मशाल’वर समता पक्षाचा आक्षेप

 

Related Posts