IMPIMP

Meghalaya High Court | 16 वर्षाची मुलगी सेक्सचा निर्णय घेण्यास सक्षम, पॉक्सोचा गुन्हा केला रद्द!

by nagesh
Meghalaya High Court | 16 yr old capable of making conscious decision about sex says meghalaya high court quashes pocso case against boyfriend

शिलाँग : वृत्तसंस्था – मेघालय उच्च न्यायालयाने (Meghalaya High Court) एका पॉक्सो प्रकरणात महत्त्वाचे मत मांडले आहे. शारीरिक संबंधाच्या (Physical Relationship) बाबतीत निर्णय घेण्यासाठी 16 वर्षांची मुलगी सक्षम असल्याचे मत मेघालय हाय कोर्टाने (Meghalaya High Court) मांडले आहे. तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) दाखल करण्यात आलेला FIR देखील रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लाईव्ह लॉ च्या वृत्तानुसार, एका तरुणावर 16 वर्षाच्या मुलीशी संबंध ठेवल्यामुळे बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही मुलगी अल्पवयीन असल्यामुळे त्या तरुणावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु हे संबंध सहमतीने झाले असल्याचा दावा तरुणीने केला होता.

न्यायमूर्ती डब्ल्यू डिएंगडोह (Justice W Diengdoh) यांच्या मेघालय उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने (Meghalaya High Court) पॉक्सो अंतर्गत दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना हे निरीक्षण नोंदवले. या तरुणाने आपले संबंध सहमतीने झाल्याचे म्हटले होते. तसेच या मुलीनेही कोर्टात दिलेल्या आपल्या जबाबात दोघांचे एकमेकांशी प्रेमसंबंध असल्याचे कबूल केलं. त्यामुळे शारीरिक संबंधावेळी कोणतीही जबरदस्ती केली गेली नाही. त्यामुळे, याकडे बलात्कार म्हणून पाहू नये, अशी मागणी तरुणाने केली होती.

मेघालय उच्च न्यायालयाने याचिकेवर निर्णय देताना मद्रास हायकोर्टाच्या (Madras High Court)
एका निर्णयाचा दाखला दिला. या घटनेतील पीडितेच्या वयातील व्यक्तीचा मानसिक आणि शारीरिक विकास पाहता, लैंगिक संबंधांच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी ते सक्षम असतात, असं न्यायालयाने नमूद केलं. न्यायालयाने तरुणाविरुद्ध दाखल केलेला पॉक्सोचा गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले.

काय आहे प्रकरण?

याचिकाकर्ता तरुण हा वेगवेगळ्या घरांमध्ये घरकाम करत होता. त्यावेळी त्याची आणि पीडितेची ओळख झाली होती.
त्याने पीडित मुलीच्या मामाच्या घरी जाऊन तीच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईला माहिती मिळाल्यावर तिने आयपीसी 363,
पॉक्सो कायदा 2012 च्या कलम 3 आणि 4 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

Web Title : Meghalaya High Court | 16 yr old capable of making conscious decision about sex says
meghalaya high court quashes pocso case against boyfriend

Related Posts