IMPIMP

Rupali Chakankar | प्रसिद्ध तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकरांची दयनीय अवस्था, महिला आयोगाने घेतली दखल; प्रशासनाला दिले ‘हे’ आदेश

by nagesh
Rupali Chakankar | womens commission notices the pathetic condition of tamasha kalawant shantabai by rupali chakankar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – प्रसिद्ध तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर (Tamasha Artiste Shantabai Kopargaonkar) यांचा अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव बस स्थानकावरील (Kopargaon Bus Station) व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओवर अनेकांनी संवेदनशील होत सरकारने याची दखल घेत त्यांना मदत करावी अशी मागणी केली आहे. आता शांताबाई कोपरगावकर यांच्या परिस्थितीची दखल राज्य महिला आयोगाने (State Commission for Women) घेतली आहे. याबाबत अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. तसेच शांताबाई यांना मदत करण्यासाठी संबंधित महिला व बाल कल्याण विभागाला सूचना दिल्याचे रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सांगितले.

तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर या ज्येष्ठ मराठी कलाकारावर (Senior Marathi Artist) उतारवयात दयनीय अवस्थेत राहण्याची वेळ आली आहे, अशा आशयाच्या बातम्या माध्यमातून समोर आल्या आहेत. आयोगाच्या वतीने तातडीने जिल्हा महिला बालविकास अधिकारी अहमदनगर यांना संपर्क करण्यात आला आहे. सध्या शांताबाई नगरच्या एका रुग्णालयात आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांची महिला बाल विकास विभागामार्फत (Women Child Development Department) वृद्धाश्रमात व्यवस्था करावी असे जि. म.बा. अहमदनगर यांना सांगण्यात आल्याचे रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी म्हटले.

https://twitter.com/ChakankarSpeaks/status/1672529289307389953?s=20

महाराष्ट्र शासनाने (Government of Maharashtra) कलाकारांच्या निवृत्ती वयात त्यांना समाधानाने जगता यावे यासाठी काही योजना सुरू केल्या आहेत. शांताबाईंना राज्य शासनाच्या योजनांमधून सन्मान जनक मानधन मिळावं, निवृत्ती वेतन मिळावं यासाठी आयुक्त, महिला बाल विकास यांना पत्र लिहून शांताबाईंना मदत मिळवून देण्यासाठीचे निर्देशही आयोगाने दिले आहेत, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

कोण आहेत शांताबाई कोपरगावकर?

एकेकाळी लावणी सम्राज्ञी म्हणून शांताबाई कोपरगावकर यांची ओळख होती.
त्यांच्या आदाकारीने लालबाग परळचं हनुमान थिएटर गाजलं होतं.
ज्यांच्या आदाकारीने आणि सौदर्याने चाळी वर्षांपूर्वी अनेक तमाशा रसिक घायाळ होत होते.
अशा लावणी सम्राज्ञीला रस्त्यावर भीक मागायची वेळ आली.
कोपरगाव बस स्थानक हेच तिचं घर बनलं होते.
त्यांच्या या अवस्थेतील व्हडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर,
सोशल मीडियातून या शांताबाई कोपरगावकर यांच्यासाठी सरकारने मदत करण्याची मागणी केली जात आहे.
मात्र आता महिला आयोगाने त्यांची दखल घेत मदतीच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.

Web Title : Rupali Chakankar | womens commission notices the pathetic condition of tamasha kalawant shantabai by rupali chakankar

Related Posts