IMPIMP

Memory Booster | मुलांचा मेंदू होईल सुपर ब्रेन, अवलंबा ‘हे’ 6 जबरदस्त उपाय; मोठ्यांसाठी सुद्धा लाभदायक

by nagesh
Memory Booster | these ayurvedic tips work as a memory booster and improve your concentration

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Memory Booster | वयानुसार स्मरणशक्ती कमी होऊ लागते. परंतु मुलांमध्ये सुद्धा ही समस्या खूप सामान्य झाली आहे. छोट्या-छोट्या गोष्टी ते विसरायला लागतात. त्यांना शाळेत दिलेले काम आठवत नाही (Memory Booster). अशी समस्या तरुणाईमध्येही असते, म्हणजेच सर्वच वयोगटातील लोकांना या समस्येचा करावा लागत आहे, परंतु असे का होते हे तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का? हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत (Memory and Concentration).

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

स्मरणशक्ती का होत आहे कमजोर?
शरीरातील पोषण कमतरता हे याचे प्रमुख कारण मानले गेले आहे. कधी कधी डोक्याला दुखापत झाल्यामुळेही गोष्टी लक्षात राहण्यात अडचणी येतात. कधी कधी कुठल्यातरी भयंकर रोगामुळे असे घडते की आपण गोष्टी विसरायला लागतो. अशा समस्येकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. त्याची लक्षणे दिसू लागल्यानंतर ताबडतोब त्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न सुरू करा. येथे काही घरगुती उपाय आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही स्मरणशक्ती कमी होण्याच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता. (Memory Booster)

 

स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय

1. ब्राह्मीचे दूध (Brahmi Milk) मेंदूसाठी खूप चांगले मानले जाते. हे दूध तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यास मदत करते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. 1 ग्लास दुधात अर्धा चमचा ब्राह्मी उकळून सुमारे 2 मिनिटे उकळवावे लागेल आणि हे दूध रोज झोपण्यापूर्वी प्यावे.

2. गाजर ज्यूसमध्ये (Carrot Juice) केशर (Saffron) टाकून प्यायल्याने स्मरणशक्ती वाढते.

3. चांगल्या स्मरणशक्तीसाठी सकाळी मोकळ्या हवेत व्यायाम (Exercise) आणि चालायला हवे.

4. शीर्षासन, कोबरा आणि धनुष्य योग (Sirsasana, Cobra, Dhanushya Yoga) ही काही आसने आहेत जी रक्ताभिसरण सुधारतात आणि विस्मरण दूर ठेवतात.

5. आहारातील हिरव्या भाज्या (Green vegetables) स्मरणशक्ती वाढवण्याचे काम करतात.

6. दुधात अक्रोड आणि बदाम (Walnut, Almond) यांसारखे ड्रायफ्रुट्स (Dry fruits) टाकून प्यायल्याने विस्मरण दूर होण्यास मदत होते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Memory Booster | these ayurvedic tips work as a memory booster and improve your concentration

 

हे देखील वाचा :

Pimpri Minor Girl Rape Case | चॉकलेटचे आमिष दाखवून 60 वर्षाच्या वृद्धाने केला 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

Ramdas Kadam Vs Shivsena | रामदास कदमांच्या ‘त्या’ विधानाच्या निषेधार्थ पुण्यात जोडे मारो आंदोलन

Fast Aging | ‘या’ 5 सवयींमुळे ऐन तारुण्यात दिसू शकता म्हातारे, आजपासूनच व्हा दूर

 

Related Posts