IMPIMP

MLA Nitesh Rane | आमदार नितेश राणेंना आणखी एक झटका, मुंबई हायकोर्टानं दिले महत्वाचे आदेश

by nagesh
Nitesh Rane | BJP MLA nitesh rane get judicial custody till february 18 court

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – MLA Nitesh Rane | शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावरील हल्ला प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपूत्र भाजपचे आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) आता चांगलेच वादाच्या भोव-यात सापडले असल्याचे दिसत आहे. आमदार नितेश राणेंचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने (Sindhudurg District Sessions Court) फेटाळल्यानंतर नितेश राणेंनी मुंबई हाय कोर्टाचा (Mumbai High Court) दरवाजा ठोठावला आहे. त्यानंतर आता हाय कोर्टाने आमदार नितेश राणेंना प्रथम सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाच्या निर्णयामुळे नितेश राणेंना मोठा धक्का बसला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाकडून (Sindhudurg District Sessions Court) आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज (Pre-Arrest Bail Application) फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे नितेश राणे यांनी मुंबई हाय कोर्टात (Bombay High Court) जामीन अर्ज दाखल केला. 111 पानांचा जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.

 

नेमकं प्रकरण काय ?
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. या हल्ल्याचा कट रचण्यात आमदार नितेश राणे यांचा सहभाग होता, असा आरोप परब यांनी केला आहे. या हल्ल्याच्या कटाचे धागेदोरे नितेश राणे यांच्यापर्यंत कसे पोहोचतात, याचे पुरावे सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयात सादर केले होते. त्यात काही कॉल डिटेल्सचाही समावेश होता. त्याची शहानिशा करण्यासाठी नितेश राणे यांचा फोन जप्त करणे आवश्यक आहे. असा युक्तीवाद त्यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे होण्यासाठी नितेश राणे अटकेत हवे आहेत, असा दावा सरकारी वकिलांनी केला होता. हा दावा मान्य करत न्यायालयाकडून आमदार नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.

 

Web Title :- MLA Nitesh Rane | mumbai high court orders mla nitesh rane to appear before sindhudurg court

 

हे देखील वाचा :

Pune Crime | गैरसमजातून दुकान पेटवून देणार्‍या चौघांवर गुन्हा दाखल; हडपसर परिसरातील घटना

Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | अ‍ॅन्टी करप्शनने परमबीर सिंह यांची केली 2 तास चौकशी; पोलीस निरीक्षक अनुप डांगे प्रकरणात नोंदविला जबाब

Pune Crime | पुण्याच्या भोसरीमध्ये लातूरच्या युवकाचा दगडाने ठेचून खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गॅरेजमध्ये दिला फेकून, परिसरात खळबळ

 

Related Posts