IMPIMP

MLA Rajan Salvi | ‘आमची निष्ठा मातोश्री चरणी कायम, मला खोक्याची गरज नाही’, शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर राजन साळवींकडून स्पष्टीकरण

by nagesh
MLA Rajan Salvi | shivsena mla rajan salvi explanation on joining eknath shinde camp

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन कोकणातील राजापूरचे आमदार राजन साळवी (MLA Rajan Salvi) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटात जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या खास व्यक्तीची भेट घेऊन याबाबत चर्चा केली होती. पुढच्या काही तासात आमदार राजन साळवी (MLA Rajan Salvi) शिंदे गटात प्रवेश करुन उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का देतील, असे वृत्त समोर आलं होतं. मात्र या वृत्तावर त्यांनी खुलासा करुन सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ठाकरे सोबत राहणार की शिंदेकडे जाणार ? या प्रश्नाचं उघड उघड आणि रोखठोक उत्तर देत आपल्या विरोधकांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एकनाथ शिंदे शिवसेनेचे 55 पैकी 40 आमदार घेऊन गेल्यानंतर 41 वा आमदारही शिंदेकडे जायच्या तयारीत असल्याचे वृत्त येऊ  लागलं. शिंदेंकडे जाणारा हा आमदार कोकणातला असल्याचं बोललं जाऊ लागलं. त्यामुळे शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी (MLA Rajan Salvi) यांच्या नावावरुन कुजबूज सुरु झाली. आता स्वत: त्यांनी ट्विट करुन स्पष्टीकरण देत आपली निष्ठा मातोश्री चरणी कायम असल्याचे म्हटले आहे.

 

 

राजन साळवी यांनी दोन ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरें (Aditya Thackeray) सोबतचा फोटो जोडला आहे.
या ट्विटमध्ये ते म्हणतात, आमची निष्ठा मातोश्री कायम चरणी…
काल आज व उद्या फक्त आमची निष्ठा शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे फक्त… असं म्हटलं.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या ट्विटनंतर काही वेळातच राजन साळवी यांनी दुसरं ट्विट केलं.
निष्ठेचे प्रमाणपत्र दि. 15 ऑक्टोबर 2002 साली हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांनी दिले मला खोक्याची गरज नाही, असा टोला त्यांनी लगावला.
या ट्विटमध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंसोबतचा (Raj Thackeray) आपला फोटो जोडला आहे.

 

Web Title : –  MLA Rajan Salvi | shivsena mla rajan salvi explanation on joining eknath shinde camp

 

हे देखील वाचा :

Irrigation scam | सिंचन घोटाळा प्रकरणात ‘या’ अधिकाऱ्याची एन्ट्री, केला गंभीर आरोप म्हणाले – ‘गेल्या 10 वर्षात घोटाळ्याची चौकशीच झाली नाही’

Dahi Handi-2022 | ‘आता कसं वाटतंय, मोकळं-मोकळं वाटतंय’, दहीहंडी उत्सवात फडणवीस यांची तुफान फटकेबाजी (व्हिडीओ)

Aditya Thackeray | ’50 थर लावले की थरकाप झालाय हे सर्वांना माहितेय’ – आदित्य ठाकरे

 

Related Posts