IMPIMP

Dahi Handi-2022 | ‘आता कसं वाटतंय, मोकळं-मोकळं वाटतंय’, दहीहंडी उत्सवात फडणवीस यांची तुफान फटकेबाजी (व्हिडीओ)

by nagesh
Dahi Handi-2022 | devendra fadnavis says our govt came and all festival in full of enjoyment and celebration

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यभरात दहीहंडी उत्सव (Dahi Handi-2022) मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. राजधानी मुंबईतही राजकीय नेत्यांनी मोठ्या दहीहंडी उत्सवाचे (Dahi Handi-2022) आयोजन केले असून अनेक गोविंदा पथकांनी भाग घेतला आहे. या उत्सवाला वेगवेगळ्या पक्षांचे नेतेदेखील उपस्थिती दर्शवत आहेत. भाजप नेते प्रकाश सुर्वे (BJP Leader Prakash Surve) यांनी मागाठाणे येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी गोविंदांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आपलं सरकार आलं आणि दहीहंडी देखील जोरदार होतेय, आता कसं वाटतंय ? मोकळं मोकळं वाटतंय ना ? असं देवेंद्र फडणवीस यांनी गोविंदांनाच विचारलं. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घेतलेल्या निर्णयामुळे तुम्ही आता गोविंदा राहिलेले नाही, तुम्ही आता खेळाडू झालेला आहात, असं सांगताच गोविंदांनी एकच जल्लोष केला.

 

 

फडणवीस पुढे म्हणाले, पाऊस सुरु होतोय आणि बघा आपलं सरकार आलं तर काय होतं ? आपलं सरकार आलं तर दहीहंडी (Dahi Handi-2022) जोरदार, गणेशोत्सव (Ganeshotsav) जोरदार, नवरात्री (Navratri) जोरात आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं, आता तुम्ही फक्त गोविंदा नाहीत. तुम्ही खेळाडू आहात. आता तुम्हाला खेळाडूंचे सर्व लाभ दिले जाणार आहेत. या ठिकाणी कुणी जखमी होऊ नये, जर झालं, तर सरकार आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे आता कसं वाटतंय ? मोकळं मोकळं वाटतंय ना, असे फडणवीस म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आपण सर्वांनी मिळून बलशाली महाराष्ट्र (Maharashtra) उभा करायचा आहे.
म्हणून आता आपण विकासाच्या हंडीतून राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचं आहे.
खऱ्या अर्थानं विकास शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे हेच आपलं ध्येय असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

 

Web Title : – Dahi Handi-2022 | devendra fadnavis says our govt came and all festival in full of enjoyment and celebration

 

हे देखील वाचा :

Aditya Thackeray | ’50 थर लावले की थरकाप झालाय हे सर्वांना माहितेय’ – आदित्य ठाकरे

Police Inspector Suspended | सराईत गुन्हेगाराला मदत करणे पडले महागात, पोलीस निरीक्षक निलंबित

Ashish Shelar | आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार; म्हणाले – ‘आम्हाला शहाणपणा शिकवू नये, तुम्ही…’

 

Related Posts