IMPIMP

Modi Cabinet Incentive Scheme | बजेटपूर्वी केंद्र सरकारची भेट ! BHIM आणि RuPay Card द्वारे खर्च केल्यास मिळणार कॅशबॅक, 2600 कोटींची स्कीम मंजूर

by nagesh
Modi Cabinet Incentive Scheme | bhim upi rupay card incentive 2600 crores central cabinet meeting nirmala sitharaman budget 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Cabinet Incentive Scheme | देशात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत २६०० कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली. या अंतर्गत यूजर्सना BHIM UPI आणि RuPay डेबिट कार्डद्वारे कमी किमतीच्या ट्रांजक्शनवर आर्थिक इन्सेंटिव्ह दिला जाईल. हे इन्सेंटिव्ह बँकेकडून दिले जाणार आहे. हे तुम्ही कॅशबॅकसारखे समजू शकता. योजनेअंतर्गत, बँकांना चालू आर्थिक वर्षात RuPay आणि UPI वापर करून ‘पॉइंट ऑफ सेल’ (PoS) म्हणजे दुकानात लावली जाणारी पेमेंट मशीन आणि ई-कॉमर्स व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन दिले जाईल. (Modi Cabinet Incentive Scheme)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एका अधिकृत ट्विटमध्ये म्हटले आहे की, मंत्रिमंडळाने रूपे डेबिट कार्ड आणि भीम-युपीआयद्वारे व्यक्ती आणि व्यापारी यांच्यातील अल्प रकमेच्या व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहन योजना मंजूर केली आहे. यामुळे एक मजबूत डिजिटल पेमेंट सिस्टम तयार करण्यात मदत होईल. योजनेअंतर्गत कमी किमतीचे आणि वापरण्यास सुलभ UPI Lite आणि UPI 123 Pay ला देखील प्रोत्साहन दिले जाईल. (Modi Cabinet Incentive Scheme)

 

 

किती खर्चावर किती प्रोत्साहन
मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, रुपे कार्डद्वारे डिजिटल पेमेंटवर ०.४ टक्के इन्सेंटिव्ह दिले जाईल. त्याच वेळी, भीम युपीआयद्वारे २००० रुपयांपेक्षा कमी व्यवहारांवर ०.२५ टक्के इन्सेंटिव्ह मिळेल. याशिवाय BHIM UPI द्वारे इन्श्युरन्स, म्युच्युअल फंड, ज्वेलरी आणि पेट्रोलियम प्रॉडक्टसारखी उत्पादने आणि सेवा खरेदी केल्यास ०.१५ टक्के इन्सेंटिव्ह मिळेल.

युपीआय पेमेंटमध्ये तेजी
भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, डिसेंबरमध्ये युपीआयद्वारे १२ लाख कोटींहून अधिक ट्रान्जक्शन झाले होते.
या महिन्यात यूपीआयच्या माध्यमातून ७३० कोटींहून जास्त ट्रान्जक्शन झाले.
हे देशाच्या जीडीपीच्या ५४ टक्क्यांच्या जवळपास आहे.
नोव्हेंबरमध्ये एकूण ट्रान्जक्शन व्हॅल्यू ११.९ लाख कोटी रुपये होती.
सन २०२२ मध्ये युपीआयद्वारे ७४०४ कोटी ट्रान्जक्शन आणखी झाले, ज्यामध्ये १२५ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले.
त्यात आणखी वाढ करण्यासाठी २६०० कोटी रुपयांचे इन्सेटिव्ह जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
याआधी २०२१ मध्ये देखील भीम यूपीआय आणि रुपे क्रेडिट कार्डांना प्रोत्साहन देण्यासाठी इन्सेटिव्हची जाहीर केले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Modi Cabinet Incentive Scheme | bhim upi rupay card incentive 2600 crores central cabinet meeting nirmala sitharaman budget 2023

 

हे देखील वाचा :

Cabinet Incentive Scheme | भीम अ‍ॅप आणि रूपे डेबिट कार्डसाठी मोदी सरकारची भरीव तरतूद

Navneet Rana | खासदार नवनीत राणांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमने; म्हणाल्या…

Solapur ACB Trap | 30 हजाराची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक (API), शिपाई आणि खासगी इसम अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Related Posts