IMPIMP

Modi Government | अखेर कुठे गेल्या 2000 च्या नोटा? मोदी सरकारने सांगितले मार्केटमधून नोटा कमी होण्याचे कारण

by nagesh
Government Scheme | ppf crorepati scheme central government how to make 1 crore rupees fund public provident fund

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नोटबंदी (Demonitisation) नंतर बाजारात चलनात आलेल्या दोन हजारच्या नोटांवरून (2,000 notes) सरकारने संसदेत मोठी माहिती दिली आहे. मोदी सरकारकडून (Modi Government) संसदेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात म्हटले आहे की, 2018-19 पासून दोन हजारच्या नोटांच्या छपाईसाठी नवीन मागणी पत्र ठेवण्यात आलेले नाही. नोटा चलनातून बाहेर होण्याचे हे सुद्धा एक कारण आहे. (Modi Government)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

अर्थ राज्यमंत्र्यांनी दिली माहिती
अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री पंकज चौधरी (Minister of State for Finance Pankaj Chaudhary) यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात राज्यसभेत (Rajya
Sabha) म्हटले की, विशेष मूल्याच्या नोटांच्या छपाईचा निर्णय सरकारद्वारे रिझर्व्ह बँके (Reserve Bank) सोबत चर्चा करून घेतला जातो.

यामध्ये जनतेच्या व्यवहारांसबंधी मागणी सुलभ करण्याकडे सुद्धा लक्ष दिले जाते. ज्या नोटांची गरज जनतेला जास्त असते. त्या नोटा चलनात आणण्याचा
निर्णय होतो.

इतक्या नोटा चलनात होत्या
त्यांनी म्हटले की, 31 मार्च, 2018 ला दोन हजारच्या 336.3 कोटी नोटा (एमपीसीएस) चलनात होत्या. ज्या प्रमाण आणि मूल्याच्या बाबतीत एनआयसीच्या
अनुक्रमे 3.27 टक्के आणि 37.26 टक्के आहेत. तर 26 नोव्हेंबर 2021 ला 2,233 एमपीसीएस चलनात होते. जे प्रमाण आणि मूल्याच्या बाबतीत
एनआयसीच्या अनुक्रमे 1.75 टक्के आणि 15.11 टक्के आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

नोटा कमी होण्याचे कारण :
चौधरी यांनी म्हटले, नोटबंदीनंतर बाजारात आलेल्या 2,000 रुपयाच्या नोटा चलनात कमी होण्याच्या पाठीमागे यासाठी नवीन मागणी पत्र न ठेवणे आहे.
त्यांनी म्हटले की, 2018-19 पासून दोन हजारच्या नोटांच्या छपाईबाबत करन्सी प्रिंटिंग प्रेसकडे कोणतेही मागणी पत्र आलेले नाही.

याशिवाय, नोटा खराब होणे किंवा कापणे-फाटणे यामुळे सुद्धा चलनातून बाहेर होतात. काळापैसा साठवण्यासाठी सुद्धा काही लोक मोठ्या किंमतीच्या नोटांचा वापर करतात.

नोटबंदीचा वादग्रस्त निर्णय :
मोदी सरकार (Modi government) ने 8 नोव्हेंबर 2016 ला रात्री 8 वाजता अचानक त्यावेळच्या 500 आणि 1,000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यामागे इतर उद्देशांसह, काळ्या पैशावर अंकुश लावण्याचे कारण सांगण्यात आले होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

या निर्णयानंतर 2,000 आणि 500 रुपयांच्या नोटांची नवीन सिरिज सादर करण्यात आली. नंतर 200 रुपयांची नोट सुद्धा सादर करण्यात आली. नोटबंदीचा निर्णय खुप वादग्रस्त ठरला होता. यामुळे अनेक आर्थिक उलथा-पालथीसह दूरगामी आर्थिक परिणाम दिसून आले.

Web Title :- Modi Government | banking and finance news rs 2000 notes now 1 75 of total banknotes in circulation Demonitisation

हे देखील वाचा :

Pune Crime | महिलेवर चाकूने वार करुन जबरी चोरी करणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

Pune Crime | कात्रज परिसरातील 4 सोसायटयांमधील फ्लॅट फोडले

Pune Corona | गेल्या 24 तासात पुणे शहरात ‘कोरोना’चे 100 रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

Stock Market | गुंतवणुकदार झाले मालामाल! 15 मिनिटात कमावले 2.75 लाख कोटी रुपये, सेन्सेक्समध्ये 800 पॉईंटची वाढ

Related Posts