IMPIMP

Modi Government | मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचार्‍यांना मोठी भेट ! गृहकर्जावरील व्याजदर केला कमी

by nagesh
Modi Government | modi government has reduced interest rates on housing loans for central government employees

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Modi Government | केंद्रातील मोदी सरकारकडून (Modi Government) केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) महत्वाची माहिती आहे. केंद्रीय कर्मचारी आता मार्च 2023 पर्यंत 7.10 टक्केपेक्षा कमी व्याजदराने हाऊस बिल्डिंग ॲडव्हान्सचा लाभ घेऊ शकणार आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. (Modi Government Has Reduced Interest Rates On Housing Loans For Central Employees)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

सन 2022 – 23 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गृहनिर्माण आगाऊ व्याज दर 7.1 टक्के असेल, असे 1 एप्रिल 2022 रोजी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या कार्यालयीन ज्ञापनमध्ये (मेमोरँडम) म्हटले आहे. मार्च 2022 पर्यंत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना वार्षिक 7.90 टक्के दराने घर बांधण्यासाठी आगाऊ रक्कम (Housing Loan) मिळत होती. (Modi Government)

 

 

घर बांधणी आगाऊ नियम 2017 सालच्या 9 नोव्हेंबर 2017 च्या आंशिक दुरुस्तीमध्ये घरावरील व्याज दर 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत सुरू होणाऱ्या सन 2022 – 23 या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना बिल्डिंग ॲडव्हान्स 7.1 टक्के दराने असेल, असे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या कार्यालयीन मेमोरँडममध्ये सांगण्यात आले आहे. दरम्यान, केंद्राच्या या निर्णयानुसार कर्मचा-यांना एक मोठा दिलासा मिळाला असून, आता 31 मार्च 2022 पर्यंत कर्मचाऱ्यांसाठी (Central Employees) हाऊस बिल्डिंग ॲडव्हान्स 7.1 टक्के व्याजदराने उपलब्ध होता. त्यात आता घट झाली आहे.

 

Web Title :- Modi Government | modi government has reduced interest rates on housing loans for central government employees

 

हे देखील वाचा :

Pune Crime | 2 डॉक्टरांना धमकावून 30 लाखाची खंडणी घेताना मंगेश कांचनला लोणी काळभोर पोलिसांकडून अटक

MNS Avinash Jadhav | ‘…तर मग मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंवरही गुन्हा दाखल करा’; राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे आक्रमक !

NCP Ravikant Varpe On Raj Thackeray | ‘राज ठाकरेंचा जन्म झाला त्या दिवशी शरद पवार…’; राष्ट्रवादीचा राज ठाकरेंना खोचक टोला

 

Related Posts