IMPIMP

Monsoon in India | अखेर मान्सूनने देशातून घेतला निरोप, भारतीय हवामान विभागाची घोषणा

by nagesh
Maharashtra Rains | light to moderate rainfall and cloudy weather possible in konkan and central maharastra on weekend

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  मागील काही दिवस दक्षिण भारत आणि ईशान्य भारतात नैऋत्य मोसमी वारे अडकून पडल्यानंतर, अखेर संपूर्ण देशातून मान्सूनने (Monsoon in India) माघार घेतल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने (IMD) केली आहे. आज 25 ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशातून मान्सून (Monsoon in India) परतला असल्याची अधिकृत माहिती हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर (Krishnananda Hosalikar) यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे. गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच मान्सून इतके दिवस भारतात सक्रिय राहिला आहे.

 

 

 

 

 

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये मान्सूनने दिमाखात (Monsoon in India) आगमन केले. त्यानंतर दोन दिवसात मान्सूनचा पाऊस मुंबईत (Mumbai) दाखल झाला. मान्सून सुरुवातीला कोसळलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे (Heavy rain) मुंबईकरांची चांगलीच धांदल उडवली होती. अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. तर सखल भागातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

यंदाच्या वर्षी मान्सून सामान्य राहणार असून सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती.
त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. 6 ऑक्टोबरपासून वायव्य भारतातून (Northwest India) सुरु झालेल्या पावनसाने राज्यात थैमान घातलं.
विदर्भ (Vidarbha), मराठवाडा (Marathwada), मध्य आणि उत्तर महाराष्ट्राला परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला. यामुळे अकोला, नाशिक परिसरात पुरजन्य परिस्थिती निमाण झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

 

Web Title: Monsoon in India |monsoon withdrawn from entire india today imd report

 

हे देखील वाचा :

Pakistan captain Babar Azam | कुराणवर हात ठेवून बाबर आझमच्या ’गर्लफ्रेंड’ने घेतली शपथ, म्हणाली – ’10 वर्षापर्यंत शोषण करत होता पाकिस्तानी कर्णधार’

Pune Corporation GB | नदीकाठ सुधार योजनेचे 3 टप्प्यांचे काम होणार पीपीपी तत्वावर; 700 कोटी रुपयांचे एका टप्प्याचे काम पालिका निधीतून तर उर्वरित 2 टप्पे ‘पीपीपी’मधून करण्याचा निर्णय

Pune News | पुण्याच्या हडपसरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी; साडेसतरा नळी आणि भोसले वस्ती परिसरात दहशतीचे वातावरण

 

Related Posts