IMPIMP

Pune News | पुण्याच्या हडपसरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी; साडेसतरा नळी आणि भोसले वस्ती परिसरात दहशतीचे वातावरण

by nagesh
Leopard in Pune | Leopard in DRDO Vishrantwadi in Pune a huge excitement in the area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune News | गेले काही दिवसांपासून हडपसर (Hadapsar), फुरसुंगी परिसरात दर्शन देणार्‍या बिबट्याने (Leopard) आज (मंगळवार) पहाटे केलेल्या हल्ल्यात एक तरुण जखमी झाला (Pune News) आहे. हडपसरमधील गोसावी वस्ती, सिरम कंपनीमागे आज पहाटे साडेपाच वाजता हा हल्ला झाला.

संभाजी बबन आटोळे (रा. गोसावी वस्ती) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या डाव्या बाजूला बिबट्याने पंजा मारल्याने त्यात तो जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

संभाजी आटोळे आणि अमोल लोंढे हे दोघे मॉर्निंग वॉकला जात होते. त्यावेळी गवतात लपून बसलेल्या बिबट्याने संभाजी आटोळे यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यात संभाजी आटोळे हे जखमी झाले. हा प्रकार समजताच परिसरातील लोकांनी तेथे एकच गर्दी केली (Pune News) आहे. हल्ला केल्यानंतर बिबट्या जवळच्या पडक्या घरात, झुडपात लपला असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.

या घटनेची माहिती आमदार चेतन तुपे (MLA Chetan Tupe) यांनी वन विभागाला कळविली आहे.
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले आहे. वन विभागाची मदत रवाना होत आहे.
या घटनेमुळे साडेसतरा नळी, गावदेवी, गोसावी वस्ती परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

 

Web Title: Pune News | leopard in Hadapsar of pune attack on two youth who went for morning walk

 

हे देखील वाचा :

Pune Corporation GB | नधिकृत केबल शोधण्यापूर्वी केबल कंपन्यांना नोटीस पाठवून ‘डिक्लेरेशन’ मागवणार – महापालिका सर्वसाधारण सभेचा निर्णय

Maharashtra Police | पोलीस अधिकाऱ्यांना कलम 36 अन्वये अधिकार प्रदान; जाणून घ्या

Pune Crime | पुण्यात 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

 

Related Posts