IMPIMP

Monsoon | Weather Alert ! पुण्यात पुढील 4 दिवस मुसळधार; रायगड, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार

by omkar
Monsoon

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मान्सून (Monsoon) आल्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने कहर केला. मुंबईसह (Mumbai Rain) उपनगराला पावसाने झोडपून काढले. असे असलं तरी अद्याप मुंबईकरांवरचं पावसाचं सावट कमी झालं नाही. आज मुंबईत Mumbai काही प्रमाणात पावसाचा जोर कमी झाला आहे. परंतु पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची Heavy rains शक्यता हवामान खात्याकडून (weather department) Weather Alert वर्तवण्यात आली आहे.

Husband Killed Wife | नवरा – बायको एकत्र बसून पित होते दारू; पतीने पत्नीचा गळा धारदार शस्त्राने कापला

Sharad Pawar | …म्हणून शरद पवार यांनी केलं शिवसेनेचं कौतुक

हवामान खात्याने (weather department) वर्तवलेल्या अंदाजानुसार, आजपासून (दि.11) पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकण पट्ट्यात पावसाचा जोर अधिक असेल,
अशी माहिती हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर ( K S Hosalikar) यांनी ट्विट करुन दिली आहे.

Pune News | मुलगा होत नसल्याने आत्महत्येस केलं प्रवृत्त, माहेरच्यांनी पतीच्या घरासमोर जाळला महिलेचा मृतदेह, तिघांविरोधात FIR

Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपवर निशाणा; म्हणाले – ‘चंद्रकांत पाटलांना फार गांभीर्याने घेऊ नका’

पुण्यात पुढील 4 दिवस मुसळधार Monsoon
पुण्यामध्ये (Pune) आजचा दिवस वगळता पुढील चार दिवस अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने (weather department) वर्तवली आहे.
यंदाच्या मोसमातील हा सर्वात मोठा सलग पाऊस Rain असणार आहे.
त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांना हाय अलर्ट

रायगड, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे.
तसेच घाटावरील पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांनाही हवामान खात्याकडून हाय अलर्ट Weather Alert जारी करण्यात आला आहे.
या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची Monsoon शक्यता आहे.
त्यामुळे प्रशासनाला सज्ज राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर मराठवाड्यातील नांदेड, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

 

Related Posts