IMPIMP

MP Sanjay Raut | ‘मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, मी फक्त शरद पवारांचे ऐकणार’, अजित पवारांच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर

by nagesh
Maharashtra Political News | sanjay raut spread fake news about ajit pawar allege chandrashekhar bawankule

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत (BJP) जाणार अशा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. राष्ट्रवादीचा (NCP)
मित्र पक्ष असलेल्या ठाकरे गटाचं (Thackeray Group) मुखपत्र असलेल्या सामनातूनही यासंदर्भात भाष्य करण्यात आलं होतं. त्यानंतर अजित पवार
यांनी माध्यमांशी बोलताना सुनावलं होतं. आमचं वकीलपत्र घेण्याचं कुणी कारण नाही, त्यांनी त्यांची भूमिका मांडावी अशा शब्दात अजित पवारांनी संजय
राऊतांना (MP Sanjay Raut) फटकारलं होतं. यावर संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले, ऑपरेशन लोटसबाबत (Operation Lotus) मी लिहिलेलं सत्य कोणाला बोचत असेल तर त्याला मी काय करु. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. खरं बोलल्यामुळे कोणी मला लक्ष्य करत असेल तर मी मागे हटणार नाही. मी सत्य बोलत आणि लिहीत राहणार. माझ्या विश्वसनीयतेवर शंका उपस्थित करण्याचा अधिकार कोणालाही नाही. फक्त शरद पवार यांनी माझ्या विश्वसनीयतेबाबत शंका उपस्थित केली तर मी त्याची दखल घेईन. मी फक्त शरद पवार (Sharad Pawar) यांचे ऐकेन, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते बुधवारी माध्यमांशी बोलत होते.

 

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु असून त्याअंतर्गत भाजपकडून अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे काही आमदार गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असा दावा संजय राऊतांनी केला होता. त्यावर मंगळवारी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी जीवात जीव असे पर्य़ंत राष्ट्रवादीत राहणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी संजय राऊतांना अप्रत्यक्ष टोला लगावला होता.

 

काय म्हणाले अजित पवार?

इतर पक्षाच्या नेत्यांकडून अजित पवार भाजपमध्ये जाणार अशी वक्तव्ये केली जात आहेत त्यांचाही समाचार अजित पवार यांनी माध्यमाशी बोलताना घेतला होता. ते म्हणाले, इतर पक्षाचे प्रवक्तेसुद्धा (Spokesperson) राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखं बोलतायत.
तुम्ही ज्या पक्षाचे प्रतिनीधीत्व करता त्याबद्दल बोला. तुम्ही ज्या पक्षाचं मुखपत्र आहे त्याबद्दल बोला. तुम्ही आम्हाला कोट करुन काहीही बोलू नका. आम्ही आमची भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचं वकीलपत्र दुसऱ्याने घेण्याचं कारण नाही, असे म्हणत त्यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) फटकारलं होतं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MP Sanjay Raut | sanjay raut hits back on ncp leader ajit pawar says i only listen sharad pawar advice

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विमाननगर पोलिस स्टेशन – आळंदीत नेऊन लग्नाचा बनाव करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Kharghar Heat Stroke Case | उष्माघात प्रकरणानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय, मंगलप्रभात लोढांनी दिली माहिती, म्हणाले- ‘यापुढे…’

Pune PMC News – TDR | पुणे महानगरपालिका : समाविष्ट गावांमध्ये टीडीआर वापरास परवानगी दिल्याने टीडीआर ला सुगीचे दिवस

 

Related Posts