IMPIMP

MP Sanjay Raut | ‘स्वयंभू असतात त्यांच्या मागे जनता जाते, शेंदुर फासलेल्यांना…’, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

by nagesh
MP Sanjay Raut | sanjay raut taunts raj thackeray said hi stone inlaid with shendur

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाईन- मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची बुधवारी एका वृत्तसमूहाच्या पुरस्कार सोहळ्यात मुलाखत घेण्यात आली. यावेळी रॅपीड फायर प्रश्नांमध्ये राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना कोणता सल्ला देणार असे विचारण्यात आले होते. त्यावेळी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांना सल्ल्याची गरज नाही ते स्वयंभू नेते आहेत, असा टोला लगावला होता. या टीकेला खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. स्वंयभू दैवत असतात त्यांच्या मागेच जनता जाते. शेंदूर फासलेल्या दगडांना कुणी नमस्कार करत नाही, अशा शब्दात संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) राज ठाकरेंना टोला लगावला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय म्हणाले संजय राऊत?

स्वयंभू दैवतं असतात त्यांच्या मागेच जनता जाते. शेंदूर फासलेल्या दगडांच्या मागे जात नाही. कुणी दगडांना शेंदूर फासतात आणि यांना नमस्कार करा असं सांगतात त्यांना लोक नमस्कार करत नाहीत. जे स्वयंभू असतात त्या स्वयंभू नेत्यांना आणि देवतांना मान मिळतो. ते स्वयंभू नेते ठाकरे कुटुंबीय आहेत. यामुळे जर कुणाला पोटदुखी होत असेल तर त्यांनी सांगावं आमच्याकडे उपचार आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

 

 

केंद्रीय गृहमंत्री धमकी देत आहेत

संजय राऊत म्हणाले की, आम्हाला मतदान करा नाहीतर दंगली होतील अशा प्रकारच्या धमक्या देणे देशाच्या गृहमंत्र्यांना शोभत नाही, असा आरोप त्यांनी अमित शाह (Amit Shah) यांच्यावर केला. तुमचं राजकारण दंगली, हत्या, बॉम्बस्फोटाचे आहे. त्यामुळे देशातील जनतेला डोळसपणे पाऊले टाकावी लागणार आहेत, असंही राऊत म्हणाले.

 

 

भाकरी फिरवण्याची वेळ आली

आता भाकरी फिरवण्याची वेळ आली असून तव्यावरची भाकरी फिरवावी लागते, ती फिरवली नाही तर करपते, त्यामुळे भाकरी फिरवण्यास विलंब करुन चालणार नाही. समाजात काही व्यक्तिंना पद असो अथवा नसो मात्र त्यांना कार्यकर्त्यांमध्ये सन्मान असतो. तो सन्मान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला पुढील पायरीवर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-   MP Sanjay Raut | sanjay raut taunts raj thackeray said hi stone inlaid with shendur

 

हे देखील वाचा :

Mumbai Police Crime News – WPSI Death | महिला पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह राहत्या घरात आढळल्याने प्रचंड खळबळ

Mundhwa Jackwell -Kharadi STP | मुंढवा जॅकवेलमधून शेतीसाठी सोडण्यात येणार्‍या प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याची गुणवत्ता सुधारणार

Music composer Avinash-Vishwajeet | ज्येष्ठ निर्माते प्रशांत घैसास यांच्या हस्ते संगीतकार अविनाश- विश्वजीत यांचा सत्कार

NCP Chief Sharad Pawar | ‘तव्यावरची भाकरी फिरवली नाही तर करपते, त्यामुळे…’, शरद पवारांच्या विधानामुळे चर्चेला उधाण; पक्षात बदलाचे संकेत

 

Related Posts