IMPIMP

Mundhwa Jackwell -Kharadi STP | मुंढवा जॅकवेलमधून शेतीसाठी सोडण्यात येणार्‍या प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याची गुणवत्ता सुधारणार

खराडी सांडपाणी प्रकल्पातील प्रक्रिया केलेले पाणी पाईपलाईनने मुंढवा जॅकवेलमध्ये घेण्याचे काम सुरू

by nagesh
Mundhwa Jackwell -Kharadi STP | The Mundhwa will improve the quality of treated wastewater released to agriculture from the jackwell

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Mundhwa Jackwell -Kharadi STP | मुंढवा जॅकवेलमधून बेबी कॅनॉलमधून (Baby Canal) सोडण्यात येणार्‍या प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिका प्रशासनाने (Pune PMC Administration) आणखी एक पाउल उचलले आहे. खराडी सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून Kharadi Sewage Treatment Plant (STP) नदीपात्रात सोडण्यात येणारे तुलनेने चांगली प्रक्रिया केलेले पाणी थेट पाईपलाईनने मुंढवा जॅकवेलमध्ये घेउन ते बेबी कॅनॉलमध्ये सोडण्यात येणार आहे. यामुळे मुंढवा जॅकवेलमधील पाण्याची गुणवत्ता सुधारेल असा दावा महापालिका Pune Municipal Corporation (PMC) प्रशासनाने केला आहे. (Mundhwa Jackwell -Kharadi STP)

 

महाराष्ट्र जीवन प्राधीकरणासोबत (Maharashtra Jeevan Pradhikaran) केलेल्या करारानुसार महापालिकेने मुंढवा येथे जॅकवेल बांधून याठिकाणी ५१५ एमएलडी (MLD) सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. नदी पात्रातून उचललेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते मुंढवा येथून बेबी कॅनॉलच्या माध्यमातून पुढील भागासाठी शेतीसाठी उपलब्ध करून देण्यात येते. परंतू प्रक्रिया केलेले हे पाणी प्रदुषित असल्याने शेतीवर तर परिणाम होत आहेच. त्याचवेळी बेबी कॅनॉलच्या ज्या ग्रामीण भागातून जातो, त्याभागातील भूजलसाठेही प्रदूषित होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आहेत. (Mundhwa Jackwell -Kharadi STP)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या पार्श्‍वभूमीवर पुणे महापालिकेने मुंढवा जॅकवेलमधील प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंढवा जॅकवेलच्या पलिकडील तिरावर असलेल्या खराडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी नदीपात्रात पाईपलाईन टाकून ग्राव्हीटीने मुंढवा जॅकवेलमध्ये आणण्याचे काम सुरू केले आहे. खराडी प्रकल्पात सध्या ४० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होते. जायका नदी सुधार योजनेतून याठिकाणी आणखी ३० एमएलडी क्षमतेचा प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. एकूण ७० एमएलडी पाणी मुंढवा जॅकवेलमध्ये येणार आहे.

 

मुंढवा जॅकवेलमध्ये नदीपात्रातून घेण्यात येत असलेल्या पाणी तुलनेने अधिक प्रदूषित आहे. मुंढवा प्रकल्पामध्ये त्या परिसरात निर्माण होणार्‍या मैलापाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यातुलनेत हे पाणी कमी प्रदूषित आहे. मुंढवा जॅकवेलमध्ये ८५ एमएलडी क्षमतेच्या सहा विहीरी व पंप्स आहेत. यापैकी चार पंप्स रोज सुरू असतात. साधारण ३४० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होते. खराडी प्रकल्पातून ७० एमएलडी पाणी घेतल्यास नदीतून २७० एमएलडी पाणी घेता येणार आहे. केवळ खराडी जॅकवेलचे ७० एमएलडी पाणी मिसळल्याने बेबी कॅनॉलमधून सोडण्यात येणार्‍या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. यासाठी कराव्या लागणार्‍या पाईपलाईनसाठी ३ कोटी रुपये खर्च असून कामाचे कार्यादेश देखिल देण्यात आले आहेत. खराडी प्रकल्प मुंढवा जॅकवेलपेक्षा सहा ते सात मिटर उंचावर असल्याने वीजपंपाशिवाय केवळ ग्रॅव्हीटीमुळे पाणी मुंढवा जॅकवेलमध्ये येणार असल्याची माहीती प्रकल्प अधीक्षक अभियंता जगदीश खानोरे (Project Superintendent Engineer Jagdish Khanore) यांनी दिली.

 

 

Web Title :- Mundhwa Jackwell -Kharadi STP | The Mundhwa will improve the quality of treated wastewater released to agriculture from the jackwell

 

हे देखील वाचा :

Music composer Avinash-Vishwajeet | ज्येष्ठ निर्माते प्रशांत घैसास यांच्या हस्ते संगीतकार अविनाश- विश्वजीत यांचा सत्कार

NCP Chief Sharad Pawar | ‘तव्यावरची भाकरी फिरवली नाही तर करपते, त्यामुळे…’, शरद पवारांच्या विधानामुळे चर्चेला उधाण; पक्षात बदलाचे संकेत

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोथरुड पोलिस स्टेशन – चक्क अतिक्रमण निरीक्षकांनी नातेवाईकांच्या नावाने मिळविले फेरीवाला परवाने

 

Related Posts