IMPIMP

MP Sanjay Raut | ‘त्या’ प्रकरणात खासदार संजय राऊत यांना नॉन बेलेबल वॉरंट जारी, पुढील सुनावणी 24 जानेवारीला

by nagesh
 Maharashtra Politics News | ncp-leader-chhagan-bhujbal-has-criticized-thackeray-group- leader-mp-sanjay-raut for saamana editorial

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यास वारंवार गैरहजर राहिल्याने शिवडी दंडाधिकारी कोर्टाने (Shivadi Magistrate Court) संजय राऊतांना (MP Sanjay Raut) हे वॉरंट बजावलं आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 24 जानेवारीला होणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मेधा सोमय्या यांचे वकील लक्ष्मण कनल (Advocate Laxman Kanal) यांनी बाजू मांडताना म्हणाले, आज कोर्टात मेधा सोमय्या यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. संजय राऊत (MP Sanjay Raut) हे पूर्वी देखील या खटल्यामध्ये उपस्थित राहिले नाहित हे आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे आज (शुक्रवार) कोर्टाने संजय राऊत यांच्याविरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट जारी (Non-Bailable Warrant Issue) केले आहे. त्यामुळे पुढील सुनावणीच्या तारखेला त्यांना हजर रहावं लागणार आहे. जर ते कोर्टात हजर राहिले नाहीत तर कोर्ट आपले अधिकार वापरेल, असे अ‍ॅड. कनल यांनी सांगितले.

 

वॉरंट जारी करण्याची मागणी

संजय राऊत यांच्याविरोधातील मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीला संजय राऊत वारंवार गैरहजर राहत असल्याने वॉरंट जारी करण्याची मागणी मेधा सोमय्या यांच्या वकिलांनी शिवडी कोर्टात केली. आज झालेल्या सुनावणीला किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या दोघेही कोर्टात हजर होते. परंतु संजय राऊत उपस्थित नव्हते.

 

संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळा (Toilet Scam)
केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल
केला आहे. जोपर्यंत वॉरंट जारी करत नाही तोपर्यंत राऊत हजर होणार नाहीत, असा युक्तीवाद मेधा सोमय्या
यांच्या वकिलांनी केला. मात्र संजय राऊत पुढील सुनावणीच्या वेळी हजर राहतील असे संजय राऊत यांच्या वकिलांनी कोर्टाला आश्वासन दिले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मेधा सोमय्यांनी कोर्टात नोंदवला जबाब

कोर्टाने शुक्रवारी मेधा सोमय्या यांचा जबाब नोंदवला.
संजय राऊत यांनी माझ्यावर खोटे आरोप करुन माझी बदनामी केली.
त्यामुळे मी राऊत यांच्याविरोधात तक्रार केली आहे.
राऊत यांनी 12 एप्रिल 2022 रोजी सामना ऑनलाईनमध्ये एक लेख लिहिला होता.
यामध्ये त्यांनी माझ्यावर कोट्यावधींचा शौचालय घोटाळा केल्याच खोटा आरोप केला होता.
ज्यामुळे माझी बदनामी झाली, असे मेधा सोमय्या यांनी कोर्टात सांगितले.

 

Web Title :- MP Sanjay Raut | sanjay raut vs medha somaiya case non bailable warrant issued against sanjay raut by sewri court in toilet scam case

 

हे देखील वाचा :

Sukanya Samriddhi Yojana | सुकन्या समृध्दी योजनेत खाते असेल तर करा हे काम; अन्यथा मिळणार नाही व्याज

RBI | KYC बाबत आरबीआय कडून मोठी घोषणा! जाणून घ्या काय आहे आरबीआयची ग्राहकांसाठीची घोषणा

Lingayat Community | लिंगायत समाजाचा २९ जानेवारीला मुंबईत विधानभवनावर महामोर्चा

 

Related Posts